IMPIMP

Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितचा बोल्ड अवतार… ‘अनुराधा’ या वेबसिरिजचं पोस्टर झालं तुफान व्हायरल…

by nagesh
Tejaswini Pandit | tejaswini pandit anuradha web series teaser is out

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Tejaswini Pandit | मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) काही दिवसांपूर्वी ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही’ असं म्हणत आपली लिपस्टिक पुसत, ‘लिपस्टिक बॅन’ (#BanLipstick) असा संदेश देत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

तेजस्विनी (Tejaswini Pandit) सोबतच अनेक अभिनेत्रींनी हा व्हिडिओ शेअर करून तिला पाठिंबा दिला. मात्र नक्की या मागं काय गुपित होते, याबद्दल नेटकऱ्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु या प्रश्नांचा उलगडा झाला आहे. संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही 7 भागांची वेबसिरिज प्लॅनेट मराठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लिपस्टिक बॅन हा त्याच्याच प्रमोशनचा एक भाग असून, प्राजक्ता माळी (Prajakta Mali), सोनाली खरे (Sonali Khare) यांनी देखील यात सहभाग घेतला होता.

 

 

नुकतंच तेजस्विनीनं ‘अनुराधा’ (Anuradha) या वेबसिरिजचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तसेच अलीकडेच या वेबसिरिजच्या पोस्टर आणि टिझरच्या प्रमोशनचा कार्यक्रम पार पडला. हे पोस्टर तुफान व्हायरल होत असून, यामध्ये तिचा अंदाज अगदीच बोल्ड दिसत आहे. तर टिझरमध्ये तिनं वेगवेगळे पात्र साकारलेले दिसून येत आहे. ‘अनुराधा’च्या निमित्तानं संजय जाधव ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा पदार्पण करणार आहे. तसेच त्यांनीच या वेबसिरिजचं लेखन केलं असून, वैभव चिंचळकर यांनीदेखील लेखन केलं आहे. हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा हे अनुराधाची निर्मिती करणार आहे.

 

 

दरम्यान, ‘अनुराधा’ या वेबसिरिजमध्ये (Webseries) तेजस्विनी समवेत सोनाली खरे, सचित पाटील, सुकन्या कुलकर्णी-मोने, स्नेहलता वसईकर, सुशांत शेलार, विद्य़ाधर जोशी, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच लिपस्टिक आणि वेबसिरिजचा नक्की काय संबंध आहे, याची ओढ आता प्रेक्षकांना लागली आहे.

 

 

 

 

Web Title :- Tejaswini Pandit | tejaswini pandit anuradha web series teaser is out

 

हे देखील वाचा :

कामाची गोष्ट ! IRCTC वर ‘या’ पध्दतीनं तात्काळ बुक करा तिकीट, कधीही मिळणार नाही वेटिंग; जाणून घ्या पद्धत

Tuljapur Accident | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या क्रूझर गाडीला भीषण अपघात; एकजण जागीच ठार, 11 गंभीर जखमी

PIB Fact Check | सरकारकडून मिळतंय आधार कार्डवर स्वस्तात कर्ज? जाणून घ्या ‘सत्य’

 

Related Posts