IMPIMP

PIB Fact Check | सरकारकडून मिळतंय आधार कार्डवर स्वस्तात कर्ज? जाणून घ्या ‘सत्य’

by nagesh
PIB Fact Check | pm yojana aadhaar card loan viral message on social media check pib fact check

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PIB Fact Check | जगातील कोणतेही माहिती समाज माध्यमांतून (Social media) आपल्यापर्यंत येत असते. मात्र, त्या माहितीची सत्यता न बघता अनेकजण शेअर करत असतात. अशी माहिती शेअर करण्यापुर्वी त्याची सत्यता जाणने महत्वाचे असते. सध्या एका मेसेजद्वारे माहिती प्रसारित (Message viral) होताना दिसते. ही माहिती अशी आहे की, सरकारकडून कमी व्याज दरात लोन देण्याबाबत सांगण्यात आलंय. सरकारकडून आधार कार्डवर (Aadhaar card) स्वस्तात कर्ज मिळत असल्याचं सांगितलं जातंय. पीएम योजनेंतर्गत सरकार दोन टक्के व्याजाने लोन देताहेत असाही दावा केला गेलाय. यामध्ये 50 टक्के डिस्काउंटची माहिती सांगितली आहे. मात्र, PIB अर्थात (PIB Fact Check) नूसार हा मेसेज पुर्णपणे चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

PIB ने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मेसेजची (Message viral) पडताळणी केली असता हा मेसेज पूर्णपणे खोटा, फेक असल्याचं म्हटलंय. तसेच, सरकारची अशी कुठलीही योजना नसल्याचं तपासणीत समोर आलं आहे. पीएम योजनेंतर्गत आधार कार्डवर लोन दिलं जाण्याचा दावा खोटा असल्याचं PIB ने सांगितलं. दरम्यान, PIB ने नागरिकांना सावध राहण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत. तसेच, असा मेसेज कुठेही फॉरवर्ड न करण्याचंही म्हटलंय. मेसेजच्या जाळ्यात अडकून तुमची खासगी माहिती कोणाशीही शेअर न करण्याचं देखील PIB ने सांगितलं.

 

 

दरम्यान, PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारबाबत कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB तथ्य तपासणीला संशयास्पद बातमीचा अथवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. तसेच, [email protected] या मेल आयडीवर मेल करता येते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- PIB Fact Check | pm yojana aadhaar card loan viral message on social media check pib fact check

 

हे देखील वाचा :

Tuljapur Accident | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या क्रूझर गाडीला भीषण अपघात; एकजण जागीच ठार, 11 गंभीर जखमी

Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये मोठा परतावा ! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 32 लाख, जाणून घ्या

Sangli Crime | सांगलीतील धक्कादायक प्रकार ! कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं CA चा महिलेवर बलात्कार

 

Related Posts