IMPIMP

Temperature in Maharashtra | उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात घट

by nagesh
Mahabaleshwar Temperature | for first time ever mercury falls to zero degree celsius in mahabaleshwar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Temperature in Maharashtra | मागील काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी (Cold) पडली आहे. त्याचबरोबर उत्तर भारत (North India), मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) थंडीची लाट पसरली आहे. यामुळे महाराष्ट्रातही काल (गुरूवार) पासून थंडीची लाट पसरली आहे. आता महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या तापमानात (Temperature in Maharashtra) घट झाली असल्याचं समोर आलं आहे. तर, जोरदार थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतातील अनेक ठिकाणी तापमानात घट झाली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश या भागातील तापमानात घट झालीय. या ठिकाणी आगामी 3 दिवस थंडीची लाट पसरणार आहे. असा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे. या घट तापमानाचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागातल्या किमान तापमानात घट झाली आहे. तर दुसरीकडे मराठवाडा (Marathwada) व मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत जास्त आहे. (Temperature in Maharashtra)

 

दरम्यान, जोरदार थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. त्याचबरोबर राज्यातील काही ठिकाणी किमान तापमान हे सरासरी तापमानाच्या जवळपास आहे. अशा तापमानाची स्थिती आगामी दोन दिवस असण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितलं आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे 11.4 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. (Temperature in Maharashtra)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) –

  • पुणे – 12.9
  • लोहगाव – 14.8
  • मुंबई – 19.8
  • सांताक्रूझ – 19.5
  • अलिबाग – 17.7
  • पणजी – 21
  • रत्नागिरी – 18.7
  • जळगाव -12.2
  • कोल्हापूर – 17.5
  • महाबळेश्वर – 12.2
  • अकोला – 14.9
  • गोंदिया – 13.8
  • नागपूर – 14.6
  • वर्धा – 13.2
  • अमरावती – 13.1
  • बुलडाणा -12
  • मालेगाव – 11.4
  • नाशिक – 12.4
  • सांगली – 16.3
  • सातारा – 16
  • सोलापूर – 15.7
  • डहाणू – 16.9
  • औरंगाबाद – 12.6
  • परभणी – 15.5
  • नांदेड – 17.2
  • ब्रह्मपुरी – 15.6
  • चंद्रपूर – 14.4

 

 

हे देखील वाचा :

Health Insurance | ‘हेल्थ इज वेल्थ’ ! नवीन वर्षात नक्की घ्या आरोग्य विमा, जाणून घ्या त्याचे फायदे

Restrictions in Maharashtra | राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा; चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध? शाळाही होणार बंद?, जाणून घ्या सविस्तर

Pune Corona | चिंताजनक ! नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात तब्बल 412 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts