IMPIMP

TET Exam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली CM उध्दव ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

by nagesh
TET Exam | BJP leader devendra fadanvis demands cbi enquiry in tet exam case maharashtra cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन TET Exam | शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली. त्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली. सुपे यांच्या निवासस्थानी दोन वेळा छापेमारी करण्यात आली. त्यामध्ये प्रथम 88 लाख रुपये सापडले. त्यानंतर आज झालेल्या कारवाईत 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. या घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

‘या घोटाळ्यानंतर म्हाडाच्या परीक्षेत (MHADA) गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला (ga software technologies pvt ltd) अभय याच तुकाराम सुपेंनी दिलं. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढलं. तर, जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे (dr. pritesh dilip deshmukh) पोलिस भरतीची ओळखपत्र (police recruitment admit card) सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती (Health Department Exam), म्हाडा, टीईटी (TET Exam), पोलिस भरती (Police Recuritment Exam) हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत आहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता CBI चौकशी व्हायलाच हवी,’ अशी मागणी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलीय.

 

पुढे फडणवीस म्हणाले, ‘CBI चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील,
नाहीतर वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही.
मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल
तर हे प्रकरण CBI ला सोपवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title :- TET Exam | BJP leader devendra fadanvis demands cbi enquiry in tet exam case maharashtra cm uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या खराडी परिसरातील गॅलेक्झी अपार्टमेंटमध्ये 91 लाखांची वीजचोरी, एकावर FIR

Kajal Aggarwal Pregnancy News | ‘सिंघम गर्ल’ काजल अग्रवालचा बेबी बंपचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर रंगल्या तिच्या गरोदरपणाच्या चर्चा..

Earn Money | नोकरी सोडून 50 हजारात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दर महिना होईल 1 लाख रुपयांची कमाई, सरकार देईल 35% सबसिडी

 

Related Posts