IMPIMP

जळगावच्या वसतिगृहात गैरकृत्य नसल्याचे गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘गरम होत असल्याने तिने घागरा काढला’

by sikandershaikh
BJP

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) जळगाव येथील शासकीय महिला वसतिगृहात (malpractice jalgaon hostel) मुलींना कपडे काढून नाचायला पोलीस आणि इतर काही व्यक्तींनी भाग पाडल्याची तक्रार करण्यात आली होती. यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, या कथित घटनेसंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवालही सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये तेथे कोणतेही गैरकृत्य घडले नसल्याचा निष्कर्ष समितीने सांगितल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली.

विविध खात्यांतील सहा महिला अधिकाऱ्यांची कथित घटनेसंदर्भात चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वसतिगृहातील सर्व १७ महिलांशी चर्चा केली. ४१ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले.

चौकशी दरम्यान तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृहात पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. पोलिसांनी व्हिडिओ काढला असे म्हटले जात असले तरी तसा कोणताही पुरावा समितीला मिळाला नाही.

सांंस्कृतिक कार्यक्रमाचे वसतिगृहातील (malpractice jalgaon hostel) महिलांनीच आयोजन केले होते.
गाणी, कविता वाचन असा तो कार्यक्रम होता.
या कार्यक्रमात एक महिला घागरा घालून नाचत होती.
मात्र, गरम होत असल्याने तिने तो काढून ठेवला, असे चौकशीतून समोर आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

बदनामी नको

जळगावातील आशादीप वसतिगृह महिला व बालविकास विभागामार्फत चालविले जाते.
ज्या महिलेने तक्रार केली, तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले आहे.
असे या खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले.
पीडित आणि घटस्फोटित महिला या शासकीय वसतिगृहात राहतात.
त्यांच्यासंदर्भात अशा प्रकारे बदनामीकारक माहिती प्रसारित करणे योग्य नाही, असेही त्या म्हणाल्या.

खासदार डॉ. सिद्धेश्वर स्वामी यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचे ‘उमरगा कनेक्शन’ !

Related Posts