IMPIMP

Tips For Healthy Heart | हिवाळ्यात हृदयाची घ्या मनापासून काळजी, निरोगी हृदयासाठी आहारात करा ‘या’ 6 विशेष फूड्सचा समावेश

by nagesh
Healthy Heart | to keep the heart healthy read this news

सरकारसत्ता ऑनलाइन – Tips For Healthy Heart | खराब जीवनशैली (Bad lifestyle), तणाव (Stress) आणि चुकीचा आहार ही बहुतांश आजारांची कारणे आहेत. खाण्याच्या वाईट सवयींचा सर्वात जास्त परिणाम हृदयावर दिसून येतो. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयाचे आरोग्य तर बिघडतेच, शिवाय हृदयविकारही होतात. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी, गांभिर्याने हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. (Tips For Healthy Heart)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, त्याचे धडधडणे थांबले तर आपला श्वासही थांबतो. माणसाच्या जीवंत असण्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे हृदयाचे ठोके. जगभरातील एकुण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयरोगामुळे (Heart Disease) होतात.

 

हृदयाचे आरोग्य राखण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. आहारात असे काही पदार्थ आहेत जे रक्तदाब, ट्रायग्लिसराईड्स, कोलेस्टेरॉलची पातळी आणि सूज यावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कोणते पदार्थ हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात ते जाणून घेवूयात. (Tips For Healthy Heart)

 

1. हिरव्या पालेभाज्या (Green leafy vegetables)
आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. पालक, केल आणि कोलार्ड या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे हृदय निरोगी ठेवतात.

 

या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जी हृदयाच्या धमन्यांचे संरक्षण करतात आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. अक्रोड आणि बदाम (Walnuts and almonds)
अक्रोड हे निरोगी आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे असे सुपरफूड आहे जे हृदयाला निरोगी ठेवते. अक्रोड रक्तदाब नियंत्रित ठेवते, कोलेस्ट्रॉल सामान्य ठेवते जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, आयर्न आणि मँगनीज यांसारख्या फायबर आणि सूक्ष्म पोषक घटकांचा खजिना आहे.

 

अक्रोड खाल्ल्याने हृदयविकार टाळता येतात हे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. बदामामुळे हृदयही निरोगी राहते. रक्तपेशी निरोगी ठेवण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.

 

3. गाजर आणि टोमॅटो (Carrots and tomatoes)
हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो आणि गाजराचा आहारात समावेश करा. टोमॅटो खराब कोलेस्ट्रॉल कमी करते,
तसेच रक्त गोठण्यास प्रतिबंध करतो. गाजर हा पोषक तत्वांचा खजिना आहे.

 

ज्यामध्ये व्हिटॅमिन C, K, B1, B2, B6, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदय निरोगी ठेवतात.
तुम्ही गाजर कच्चे खाऊन, रस बनवून किंवा भाज्यांमध्ये वापरू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. बिया (Chia seeds)
आहारात चिया सीड्स, आळशी आणि भांगच्या बियांचा समावेश करा.
हे फायबर आणि ओमेगा – 3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध आहे. जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की या बिया सूज, हाय ब्लड प्रेशर,
कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्ससह अनेक हृदयरोगात सुधारणा करतात.

 

Web Title :- Tips For Healthy Heart | healthy foods to make your heart healthy know best foods list

 

हे देखील वाचा :

Benefits Of Paneer | रोज सकाळी अशाप्रकारे खाण्यास सुरू करा 100 ग्रॅम पनीर, दूर पळतील आजार; होतील 10 जबरदस्त लाभ

Pune Political News | ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेसला मोठा झटका, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश

High BP Symptoms | हाय ब्लड प्रेशरच्या ‘या’ 8 वॉर्निंग साईनकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

 

Related Posts