IMPIMP

Tuljapur News | तुळजापूर यात्रा रद्द, मात्र दर्शनास ‘मुभा’ !

by nagesh
Tuljapur News | Tuljapur Yatra canceled, but ‘Darshan’ allowed

तुळजापूर : सरकारसत्ता ऑनलाइन   Tuljapur News | राज्यातील मंदिरे खुली करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ७ ऑक्टोबरपासून मंदिरे खुली होणार आहे. त्यामुळे तुळजापूर (Tuljapur News) येथे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे (tulja bhavani mandir trust) आयोजित करण्यात येणार्‍या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्व तयारी सुरू झाली आहे. मात्र मंगळवारी झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत तीन दिवसीय यात्रा न भरवता भाविकांना दर्शन घेण्यास मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या महोत्सवानिमित्त  जारी करण्यात येणार्‍या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकार्‍यांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (kaustubh diwegaonkar, collector osmanabad) यांनी दिला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील (mla ranajagjitsinha patil) , जिल्हा पोलिस अधीक्षक नीवा जैन (sp neeva jain), तुळजापूरचे (Tuljapur News) तहसीलदार तथा विश्वस्त सदस्य सौदागर तांदळे (Saudagar Tandale), तहसीलदार तथा p (Yogita Kolhe), पोलिस अधिकारी काशीद आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, कोरोना नियम पाळून भाविकांना दर्शनाची सोय करण्यात येत आहे. पुजारी, सेवेकरी आणि मानकर्‍यांबरोबरच संबंधित प्रशासकीय अधिकारी, मंदिर संस्थानशी संबंधित कर्मचार्‍यांचे आणि नागरिकांचे लसीकरण करण्यास भर देण्यात येणार आहे. त्यासाठी तुळजापूर शहरात लसीकरणाचे विशेष शिबीर घेण्यात येणार आहे. नवरात्र महोत्सवातील सर्व पूजा, विधी सर्व प्रकारचे पावित्र्य राखण्यात येईल. सुरक्षेच्या अनुषंगाने मंदिरातील सीसीटीव्हीचे काम व्यवस्थीत सुरू असल्याची खात्री करून घेतली आहे.  नगरपालिकेने बसविलेले सीसीटीव्ही सुरु करायची गरज असेल तर तेही मंदिर संस्थानतर्फे सुरु करण्यात येणार आहे. महोत्सवानिमित्त जारी करण्यात येणाऱ्या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकार्‍यांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : Tuljapur News | Tuljapur Yatra canceled, but ‘Darshan’ allowed

 

हे देखील वाचा :

LIC New Jeevan Anand Policy | एलआयसीची नवीन पॉलिसी ! दररोज 76 रुपये वाचवा अन् मॅच्युरिटीवेळी मिळवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

Raju Shetty | आमचा दसरा कडवट झाला, तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी

Thane News | द्यायची होती कोविड-19 व्हॅक्सीन पण दिली रॅबीजची लस, नर्सला करण्यात आले निलंबित

 

Related Posts