IMPIMP

Raju Shetty | आमचा दसरा कडवट झाला, तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही – राजू शेट्टी

by nagesh
Raju Shetti | swabhimani shetkari saghtana leader raju shetti claims maharashtra goverment minister take bribe from goverment servant

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Raju Shetty | तीन टप्यात ऊसाची एफआरपी देण्याच्या निर्णया विरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी देखील या निर्णया विरोधात राण उठवण्यास सुरुवात केली आहे. शेट्टी यांनी हा निर्णय मागे घ्या अन्यथा शेतकऱ्यांचा दसरा कडवट झाला तर राज्यकर्त्यांनो तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शेतकऱ्यांना घामाचे चार पैसे देण्याचं साखर कारखानदार यांच्या मनात नाही, त्यामुळे नीती आयोगाला हाताला धरून एफआरपीचे तुकडे पडण्याचे काम सुरू केल आहे. केंद्रातल्या भाजप सरकारने तुकडे करण्याचं काम तेच आता पुण्यात आंदोलन करत आहेत, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.

उसाच्या एफआरपीसाठी घटस्थापनेपासून जोतिबाचे दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे.
जोतिबा, अंबाबाई, बाळू मामा यांचं दर्शन घेऊन आंदोलनाला सुरुवात होईल. ‘जागर एफआरपीचा,
आराधना शक्तीस्थळांची’ असं आंदोलन असल्याचं शेट्टी यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, दरवर्षी होणारी ऊस परिषद यंदा 19 ऑक्टोबर रोजी होणार असून कुणाची परवानगी मागणार नसल्याचं शेट्टी (Raju Shetty) यांनी म्हंटले आहे.

 

Web Title :- Raju Shetty | If our Dussehra is bitter, the rulers will not allow your Diwali to be sweet – Raju Shetty

 

हे देखील वाचा :

Thane News | द्यायची होती कोविड-19 व्हॅक्सीन पण दिली रॅबीजची लस, नर्सला करण्यात आले निलंबित

Pune News | महिला अत्याचाराविरुद्ध विविध संघटना एकवटल्या; सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी

खुशखबर ! SBI कडून ज्येष्ठ नागरिकांना गिफ्ट, मार्च 2022 पर्यंत मिळेल ‘या’ विशेष योजनेचा लाभ; जाणून घ्या

 

Related Posts