IMPIMP

Uday Samant | राष्ट्रवादीचे 10-12 आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा खळबळ

by nagesh
Uday Samant | uday samant visits sangli jath 42 villages who warns to go into karnataka over water issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)) 10-12 आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत, संपर्कात असलेल्या
या आमदारांचा योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असा खळबळजनक दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. कालच
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी याबाबत सतोवाच केल्यानंतर आज उदय सामंत (Uday Samant) यांनी हे वक्तव्य
केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ठाणे ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी काही दिवसापूर्वी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) आणि शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांची बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. तटकरे हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळचे नेते मानले जातात. आज उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादीचे 12 ते 13 आमदार संपर्कात असल्याचे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार का, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी मंत्री असलेल्या शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचे विधान केले होते.

 

दरम्यान, पवार कुटुंब फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर सारवासारव करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, काहीतरी गैरसमज झाला असेल. रोहित पवार असे बोलूच शकत नाही. तसे काही असेल तर त्यांना मी दुरुस्त करायला सांगतो. रोहितशी बोलावे लागेल, त्याने नेमके कशामुळे हे वक्तव्य केले ते पाहावे लागेल. अनेकवेळा माध्यमांमध्ये वक्तव्याचा विपर्यास होतो.

 

दरम्यान, आपल्या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर स्वत: रोहित पवार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, फोडाफोडीचे राजकारण होत आहे.
शिवसेना (Shivsena) हा मोठा पक्ष फोडण्यात आला.
एक मोठा पक्ष फोडल्यानंतर फोडाफोडीचेच राजकारण करायचे असेल, तर दुसरा मोठा पक्ष हा राष्ट्रवादी आहे.
एक मोठा पक्ष फोडल्यानंतर पुढील टार्गेट हे राष्ट्रवादी असू शकते, असे मी बोलता बोलता म्हणालो.
मी भाजपा म्हणालो नव्हतो, तर विरोधात असलेल्या पक्षाचे, असे मी म्हणालो होतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uday Samant | ncp 10 to 12 mlas in contact with devendra fadnavis and eknath shinde says uday samant

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागली, एकनाथ खडसेंचा दावा

Jagdish Mulik | वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करून देणार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आश्वासन; भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती

Jayant Patil | शिंदे गटातील आमदारांना पश्चाताप होत आहे, जयंत पाटलांचा मोठा दावा

 

Related Posts