IMPIMP

Jayant Patil | शिंदे गटातील आमदारांना पश्चाताप होत आहे, जयंत पाटलांचा मोठा दावा

by nagesh
Jayant Patil On President Rule In Maharashtra | If there is no mid-term elections in Maharashtra, there is a possibility of imposition of President's rule, claims Jayant Patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत बंडात सामिल होऊन गेलेल्या आमदारांना पश्चाताप
होत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. तसेच हे आमदार आता आपल्या विद्रोहाचा
पुर्नविचार करत आहेत, असा मोठा दावा देखील जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेलं नाही आहे. जे लोक बंडात सामिल झाले त्यांनी आपले काही उद्देश आणि लाभ ठरविले होते. हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार आता पश्चाताप करत असून, पुर्नविचार करु लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्रात वेगळेच चित्र दिसेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नामोहरम करणे, त्यांना अडचणीत आणणे, असे उद्योग राज्यात काही लोक करत आहेत. मात्र, ठाकरे यांना घाबरविण्याचा काहीही उद्देश असला, तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडणार नाहीत, असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पावसामुळे झालेली हानी आणि अतिवृष्टीमुळे पुण्यात झालेली दुर्दशा याकडे राज्य सरकारने (State Government) लक्ष घातले पाहिजे. राज्य सरकारने या प्रकरणांत लक्ष घालून मदत केली पाहिजे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात आहेत.
पुण्यात प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली. सामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम झाला.
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली. मात्र, मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकले आहेत,
असे जयंत पाटील म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jayant Patil | ncp jayant patil on maharashtra governement ekanth shinde shivsena

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे न देता शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक, हवेली तालुक्यातील घटना

Pune PMC-Traffic Police | पुणे महापालिकेने वाहतूक पोलिसांना त्यांचे ‘कर्तव्य’ निदर्शनास आणून दिले ! बंदी असलेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांना अटकाव करावा; बस, रिक्षा अधिकृत थांब्यांवरच थांबतील अशी कार्यवाही करावी

Sushma Andhare | संजय राऊतांना सुषमा अंधारेंची भिती वाटू लागली आहे, शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला

 

Related Posts