IMPIMP

Eknath Khadse | शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागली, एकनाथ खडसेंचा दावा

by nagesh
MLA Chandrakant Patil On Eknath Khadse | 'Eknath Khadse's role is that everyone wants you and your family' - Muktainagar MLA Chandrakant Patil

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन  शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) भाष्य करत त्यांच्या सरकारची सध्याची
अवस्था एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet
Expansion) वाट पाहत आहेत. कारण, प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath
Khadse) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत असून, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जस जसा उशीर होत आहे, तस तशी आमदारांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. आता ही अस्वस्थता उघडपणे बाहेर पडत असून, मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार, यासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत.

 

सुरुवातीला हे सरकार आल्या दिवसापासून मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) अशा दोनच मंत्र्यांनी राज्याचा कारभार काही दिवस पाहिला. त्यानंतर काही महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. काही दिवसांनी खाते वाटप झाले. काही राज्यमंत्र्यांची नियुक्ती झाली. नंतर काही पालकमंत्र्यांची नियुक्ती झाली, असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

 

आता भाजपमधील आमदार (BJP MLA) आणि इकडून गेलेले 50 आमदार वाट पाहत आहेत,
आपल्याला मंत्रिपद केव्हा मिळणार. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.
त्यातच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्यापालांच्या निर्देशानुसार अनेक विकासकामे आणि नीधी रद्द केले आहेत.
त्यामुळे त्यांची देखील ही अस्वस्थता वाढतच चालली आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे मिळून आमदारांची ही नाराजी घालविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Khadse | MLAs in the Shinde-Fadnavis government began to feel uneasy, claims Eknath Khadse

 

हे देखील वाचा :

Jagdish Mulik | वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करून देणार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आश्वासन; भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती

Jayant Patil | शिंदे गटातील आमदारांना पश्चाताप होत आहे, जयंत पाटलांचा मोठा दावा

Pune Crime | खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे न देता शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक, हवेली तालुक्यातील घटना

 

Related Posts