IMPIMP

Pune CNG Pump | ग्रामीण भागातील सीएनजी पंपचालक संपावर; वाढीव कमिशन मिळत नसल्याने घेतला निर्णय

by nagesh
Pune CNG Pump | cng gas pump operators in rural areas will go on strike again

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune CNG Pump | गुजरात येथील टोरेंट गॅस (Torrent Gas) या कंपनीच्या विरोधात पुणे ग्रामीणमधील (Pune
Rural) सीएनजी पंप चालक संपावर जाणार आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात गुजरात येथील टोरेंट गॅस ही कंपनी पंपचालकांना गॅसपुरवठा करते.
शासनाकडून मंजूर केलेले वाढीव कमिशन देण्यास ही कंपनी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे पुण्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पंपचालकांनी २७
जानेवारीपासून सीएनजी गॅस खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
(Pune CNG Pump)

 

केंद्र शासनाकडून (Central Government) सीएनजी वितरकांकरिता वाढीव कमिशन जाहीर केले आहे. पुणे शहरातील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) वाढीव कमिशन विक्रेत्यांना दिले आहे. मात्र, ग्रामीण भागात पुरवठा करणाऱ्या टोरेंट गॅस कंपनी हे वाढीव कमिशन देण्यास टाळाटाळ करत आहे. यासंदर्भात यापूर्वी देखील गॅस विक्रेत्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी विक्रेते आणि कंपनी व्यवस्थापनाची एक बैठक घेतली होती. त्यात कंपनीकडून कमिशन देण्यासाठी वेळ मागितला गेला होता. पुन्हा दुसऱ्यांदा देखील वेळ वाढवून देण्यात आली. तरी देखील कंपनीकडून कमिशन वितरीत करण्यात आले नाही. कधीपर्यंत वितरीत करणार यावर देखील कंपनीकडून काही स्पष्टीकरण येत नाही. त्यामुळे विक्रेत्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी दिली. (Pune CNG Pump)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केंद्र शासनाकडून २०२१ मध्ये सीएनजी डिलर्सना फेअर ट्रेड मार्जिन (कमिशन) (DFTM) जारी करण्यात आले.
मात्र, पुण्याच्या ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणाऱ्या टोरेंट गॅस कंपनीला अनेकदा विनंती करून देखील त्यांनी कमिशन दिले नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील सीएनजी वितरकांचे जवळपास ८ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे असा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कमिशन देण्यात येवू नये असा कोणताही आदेश केंद्राकडून आलेला नाही.
असे असताना देखील यात टाळाटाळ केली जात आहे. सध्या केवळ विक्रीवर मिळणारे कमिशन हे परवडणारे नाही.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंपचालकांनी २७ जानेवारी पासून टोरेंट सीएनजीची खरेदी आणि विक्री अनिश्चित काळासाठी बंद केली आहे.

 

Web Title :- Pune CNG Pump | cng gas pump operators in rural areas will go on strike again

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | एकाच कुटुंबातील 7 जणांच्या आत्महत्येचे गुढ उकलले, मुलाने मुलीला पळवून नेलं अन्…, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pune Crime News | रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Pune Traffic News Updates | माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

 

Related Posts