IMPIMP

Uday Samant | उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता, खोपकर यांचे उपहासात्मक ट्विट, म्हणाले…

by nagesh
Uday Samant | uday samant visits sangli jath 42 villages who warns to go into karnataka over water issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Uday Samant | पुण्यातील मनसे (Pune MNS) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या भेटीनंतर अभिजीत पानसे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली. यावर आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी खुलासा केला आहे. खुलसा करताना अमेय खोपकर यांनी उपहासात्मक ट्विट केले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

अभिजित पानसे यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अमेय खोपकर यांनी सुरु असलेल्या चर्चांना उत्तर दिले आहे. अमेय खोपकर (Ameya Khopkar) ट्विटमध्ये म्हणतात ‘गौप्यस्फोट!!! अभिजीत पानसे यांनी उदय सामंत (Uday Samant) यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण वगैरे आलंय. पानसे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबुज सुरु झाली. पण खरी बातमी तर अशी आहे की उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणून तर ते पानसेंना गुप्तपणे भेटले. (फोडनाक सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुड्या सोडायला फार डोकं लागत नाही हेच खरं)’, असे खोपकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, या भेटीवर मनसेचे दुसरे मोठे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी देखील खुलासा केला आहे.
हि भेट मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानेच झाल्याचे जाधव यांनी सांगितले.
पानसे-सामंत यांच्या भेटीचा फोटो खरा आहे. पण त्या फोटो मागचे आणि भेटीमागचे कारण म्हणजे,
येत्या 19 तारखेला ठाण्यातील गडकरी रंगायतन (Gadkari Rangayatan Thane)
येथे मनसेची शिक्षण परिषद (MNS Education Council) होणार आहे.
याच परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून अभिजीत पानसे यांनी
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मंत्री उदय सामंत आणि वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती.
या परिषदेचे आमंत्रण राज ठाकरे यांनाही असून यात अनेक शिक्षण तज्ज्ञ सहभागी होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

 

Web Title :- Uday Samant | uday samant likely to join mns ameya khopkar satirical tweet

 

हे देखील वाचा :

Permanent Work From Home | ‘पर्मनंट वर्क फ्रॉम होम’ पाहिजे का? सॅलरी स्ट्रक्चर बदलण्याच्या तयारीत सरकार, मिळू शकतात अनेक फायदे

Miss World-Mansa Waransi | मिस वर्ल्ड 2021 स्पर्धा तूर्तास स्थगित ! भारताच्या ‘मानसा वाराणसी’सह 17 सौंदर्यवतींना कोरोनाची लागण

OBC Reservation Maharashtra | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर 18 जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

 

Related Posts