IMPIMP

Uddhav Thackeray | चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra winter session 2022 shivsena uddhav balasaheb thackeray group ousted from list of table chairpersons

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अंधेरी पोटनिवडणूक (Andheri By-Election) बिनविरोध करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून भाजपने निवडणुकीतून माघार घेतली. त्यावर प्रथमच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवले आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) लगावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठविले आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला. केवळ आणि केवळ आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा आणि शिवसेना संपवायची या हेतूने हे सर्व करण्यात आले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केला आहे. बुलढाण्यातील शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मशाल हातात धरुन आम्ही कायम आपल्यासोबत राहू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.

 

यावेळी ठाकरे म्हणाले, आपल्याला अडकविण्याचे बरेच प्रयत्न झाले आणि होत आहेत. शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह (Dhanushyaban Symbol) जरी गोठविले असले, तरी मशाल (Mashal Symbol)तुम्ही पुढे घेऊन जात आहात. धनुष्यबाण रामाचे होते. त्याने रावणाला मारण्यात आले. आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखविणारी मशाल आपल्याकडे आहे. ती पुढे घेऊन जात काम करुया.

 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. लवकरच मी महाराष्ट्र दौरा करणार असून,
आगामी काही दिवसांमध्ये मी बुलढाण्यात येऊन सभा घेणार असल्याचे देखील ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी ठाकरेंनी राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांचे कौतुक केले.
गद्दारांनी अनेक आमिषे दाखविली, पण राजन साळवी कोणत्याही अमिषाला बळी न पडता,
आज आपल्यासोबत आहेत. गद्दारांनी आपल्याशी गद्दारी केली.
पण त्यांच्या छाताडावर नाचून आपण भगवा फडकवू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांना दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray criticism on shinde group and bjp

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ताडपत्री चोरण्याचा जाब विचारल्याच्या रागातून रॉडने मारहाण, कोंबडी पुलावरील घडना

MLA Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांची कुडाळमधून चौफेर फटकेबाजी; ‘त्या’ घटनेची आठवण करुन देत भाजपवर केला प्रश्नांचा भडीमार

Pune Crime | विमानतळ परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाला लुटले

T20 World Cup 2022 | टीम इंडिया 17 दिवस आधी ऑस्ट्रेलियात का पोहोचली? हार्दिक पंड्याने सांगितले कारण

 

Related Posts