IMPIMP

Uddhav Thackeray | ‘बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारका’त शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री असतील, पण…, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला (व्हिडिओ)

by nagesh
Maharashtra Politics | eknath shinde camp rahul shewale deepak kesarkar targets uddhav thackeray over shivsena issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   मागील काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आपण आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी राजकीय स्थिती असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारका’च्या (Balasaheb Thackeray National Memorial) कामाचा आढावा घेतला. मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कसे असेल? याचं सादरीकरण करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोला लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकात असतील, शिवसेनेच्या नावावर तोतयागिरी करुन मुख्यमंत्री झालेल्यांचे फोटो नसतील, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. तसेच माझी ऊर्जा कधी कमी होत नाही, माझ्यात बाळासाहेब आहेत, त्यामुळे माझ्यातली ऊर्जा कधी कमी होतच नाही, असेही ठाकरे म्हणाले.

 

 

उद्धव ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारकडून (State Government) मदत होतेय, मात्र त्यासंदर्भात सुभाष देसाई (Subhash Desai) उत्तर देतील. आधी मी बोलतो नंतर देसाईंना माईक देतो, नंतर त्यांच्या हातून माईक परत घेणं बोरोबर नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

 

ते पुढे म्हणाले, हे प्रेझेंटेशन बेसिक स्वरुपाचं आहे, बाकी देखील अनेक गोष्टी आपण तिथे करणार आहोत.
म्युझियम संदर्भात काम करत आहेत त्यांच्याबद्दल देखील चर्चा झाली.
अनेकांनी विचारलं पुतळा कुठे असेल मात्र इथे पुतळा नाही. हे म्युझियम प्रेरणा स्थान असणार आहे.
काहींना वाटतेय की वेळ लागतोय, मात्र ती हेरिटेज वास्तू आहे. त्या वास्तूला धक्का न पोहोचवता काम करतो आहोत.
संग्राहालयाला धोका पोहोचणार नाही असं बांधकाम करावं लागतंय, बाजूला समुद्र आहे, जमिनीखाली देखील बांधकाम करावं लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray slam eknath shinde in mumbai bkc marathi news

 

 

हे देखील वाचा :

T20 World Cup | ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपमधून बाहेर, ‘या’ दोनपैकी एका टीमशी होणार भारताचा सामना?

Pune Crime | बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या 5 जणांना अटक, जाणून घ्या ‘फायरिंग’चे कारण

Himesh Reshammiya | ‘निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता हिमेशच आणि प्रेक्षकही फक्त हिमेश’ असे म्हणत नेटकऱ्यांनी उडवली हिमेशची खिल्ली

 

Related Posts