IMPIMP

Pune Crime | बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या 5 जणांना अटक, जाणून घ्या ‘फायरिंग’चे कारण

by nagesh
Pune Crime | 5 people arrested for firing at journalist in Baramati, incident happened due to petty dispute

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune Crime | किरकोळ वादातून पत्रकारावर गोळीबार (Journalist Firing Case) केल्याची घटना गुरुवारी (दि.3) सायंकाळी 5.30 ते 5.45 या दरम्यान बारामती तालुक्यातील जळोची गावच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch (LCB) पाच जणांना अटक (Arrest) केली आहे. किरकोळ वादातून सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथिदारांनी हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न (Pune Crime) झाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सराईत गुन्हेगार शुभम विकास राजपुरे Shubham Vikas Rajpure (वय २४, रा. राजपुरेवाडी, मुर्टी मोडवे, बारामती), तुषार चंद्रकात भोसले Tushar Chandrakant Bhosale (वय २२, रा. रूई पाटी, बारामती), तेजस रतीलाल कर्चे Tejas Ratilal Karche (वय २१, रा. सूर्यनगरी, एमआयडीसी, बारामती), विक्रम लालासाहेब बोबडे Vikram Lalasaheb Bobde (वय २६), सूरज राजू काशीद (वय २७ दोघे रा. रुई सावळ, बारामती) अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

बारामती परिसरातील जळोची रस्ता परिसरात ऋत्विक जीवन मुळीक (Ritvik Jeevan Mulik) रस्ता ओलांडत असताना आरोपी तुषार भोसले दुचाकीवरुन जात होता. दुचाकीने हुल दिल्याने मुळीक आणि भोसले यांच्यात किरकोळ वाद झाला. त्या वेळी भोसलेने मुळीक याला मारहाण करुन तेथून पसार झाला. काही वेळानंतर तुषार भोसले, साथीदार सूरज काशीद, शुभम राजपुरे, तेजस कर्चे, विक्रम बोबडे तेथे आले.

 

आरोपींनी मुळीक, त्यांचे मित्र पत्रकार गणेश जाधव (Journalist Ganesh Jadhav), अतुल भोलाशंकर (Atul Bholashankar) यांना मारहाण केली. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. या घटनेत जाधव गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाले. ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी आरोपींना पकडण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि बारामती पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन आरोपींना पिंपरी-चिंचवड परिसरातील एका लॉजमधून अटक केली.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी शुभम राजपुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुन (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दरोडा (Robbery), जबरी चोरी, खंडणी (Extortion), विना परवाना शस्त्र बाळगणे, मारामारी, चोरी असे 13 गुन्हे दाखल आहेत. सध्या तो भोसरी येथील खुनाच्या गुन्ह्यात कोरोना कालावधीत जेलमधुन रजेवर सुटलेला आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte),
अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते (Addl SP Baramati Division Milind Mohite),
उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Officer Ganesh Ingle)
याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke),
पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे (Police Inspector Prabhakar More), सहायक निरीक्षक नेताजी गंधारे (API Netaji Gandhare),
सचिन काळे (API Sachin Kale), पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत (API Abhijit Sawant),
अमित सिद-पाटील (API Amit Sid-Patil), पोलीस अंलदार प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, काशीनाथ राजापुरे,
हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षिरसागर, आसिफ शेख, अभिजीत एकशिंग, अमोल शेंडगे, बाळासाहेब खडके, प्राण येवले,
धिरज जाधव, दगडु विरकर तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशनचे (Baramati Taluka Police Station)
सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे (API Yogesh Langote), पोलीस उपनिरीक्षक दडस-पाटील, पोलीस अंमलदार राम कानगुडे, नरुडे, दराडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | 5 people arrested for firing at journalist in Baramati, incident happened due to petty dispute

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | ‘विराटला बाद करण्यासाठी…..!’, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी कर्णधार क्रेग एर्विनचे मोठे वक्तव्य

Roger Binny | ICC ने भारताला दिले झुकते माप, रॉजर बिन्नी म्हणाले….

Bindi Controversy | आई कुठे काय करते मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने टिकली प्रकरणावर केले भाष्य ; जाणून घ्या नक्की काय म्हणाली

 

Related Posts