IMPIMP

Pune Crime | व्हिडिओ काढल्याच्या संशयावरुन महिलेच्या त्रासाने तरुणाने केली आत्महत्या; खडक पोलिस ठाण्यात गुन्हा

by nagesh
Pune Pimpri Crime News | A shocking incident in Moshi where the owner of the house was brutally beaten and molested after paying the house rent

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शेजारी राहणार्‍याने आपला व्हिडिओ (Video) काढला या संशयावरुन त्याच्याशी भांडणे करुन त्याला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. महिलेच्या या धमकीमुळे तरुणाने घरातून निघून जाऊन कॅनॉलमध्ये उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. (Pune Crime)

 

याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत नुतन सचिन बाहुले Nutan Sachin Bahule (वय २६, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२२/२२) दिली आहे. त्यानुसार जेबा इमरान सय्यद Jeba Imran Syed (वय ३०, रा. भवानी पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. नयन नरेंद्र मोरे (Nayan Narendra More) (वय २०, रा. भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार २३ जुलै रोजी घडला होता. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहतात.
नयन याने त्याचे मोबाईलमध्ये आरोपीचे व्हिडिओ काढले नसतानाही ते काढल्याच्या कारणावरुन भांडणे केली.
आरोपी जेबा हिने भावाच्या मदतीने नयन याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन नयन घरातून निघून गेला.
रात्री उशीरापर्यंत तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या घरच्यांनी खडक पोलिस ठाण्यात तो बेपत्ता (Missing) झाल्याची तक्रार दिली.
२५ जुलै रोजी वैदुवाडी कॅनॉल हडपसर (Vaiduvadi Canal Hadapsar) येथे त्याचा मृतदेह मिळून आला.
त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत जेबा हिच्याविरुद्ध तक्रार दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी नयन याला जीवे मारण्याची धमकी देऊन, त्याचा मानसिक छळ करून, चिथावणी देऊन, त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक डोंगळे (PSI Dongle) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | The young man committed suicide due to the harassment of the woman on the suspicion of taking the video khadak police station

 

हे देखील वाचा :

Central Govt Employees Promotion | केंद्र सरकारची मोठी घोषणा ! सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार आहे प्रमोशन, मंत्री म्हणाले – दोन ते तीन आठवड्यात होईल जाहीर

Supreme Court On PMLA Act | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, PMLA अंतर्गत कारवाईच्या हस्तक्षेपास नकार

Pune Crime | ज्युनिअर महिला वकिलाचा विनयभंग करणार्‍या वकिलावर गुन्हा दाखल

 

Related Posts