IMPIMP

संघाची पार्श्वभूमी, तळागाळातील नेत्यांची प्रतिमा, तीरथ सिंह रावत यांना मिळाली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची, जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही

by pranjalishirish
Netizens criticize Chief Minister Tirath Singh Rawat for 'ripped jeans'

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – उत्तराखंडच्या uttarakhand पौरी-गढवाल लोकसभा मतदारसंघाचे खासदार तीरथ सिंह रावत यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या जागी तीरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. संघाच्या पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थी राजकारणापासून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या तीरथ रावत यांना तळागाळातील नेते मानले जाते आणि आता पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तराखंड uttarakhand विधानसभा निवडणुकीत भाजपला जिंकण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपवली आहे.

तीरथ सिंह रावत यांचा हा प्रवास गावपातळीपासून सुरू झाला. संयम, सहनशीलता आणि कष्टकरी यामुळे त्यांची प्रतिमा अधिक दृढ झाली. विद्यार्थी संघटना एबीव्हीपीपासून राजकारणाची सुरुवात करणारे तीरथ सिंह रावत यांनी उत्तर प्रदेश आणि त्यानंतर उत्तराखंडच्या राजकारणात हस्तक्षेप केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बी. एस. खंडुरींचा मुलगा मनीष खंडुरी यांचा जवळपास ३ लाख मतांनी पराभव करून जागा जिंकली होती. पण आता भाजपने त्यांना त्रिवेंद्र सिंह रावत यांना पर्याय म्ह्णून राज्य सत्तेची सत्ता दिली आहे.

तीरथ सिंह होते प्रांताचे प्रचारक
उत्तराखंडमधील uttarakhand पौरी जिल्यातील कल्जीखाल ब्लॉकच्या सिरों या गावचे रहिवासी असलेल्या तीरथ सिंह रावत यांचा राजकीय प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. तीरथ सिंह रावत यांचा जन्म ९ एप्रिल १९६४ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कलाम सिंह रावत आणि आईचे नाव गौरी देवी आहे. त्यांच्या सर्व भांवडांमध्ये तीरथ सिंह लहान आहेत. ते विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून दाखल झाले. वयाच्या २० वर्षी ते सन १९८३ मध्ये संघाचे प्रचारक झाले आणि १९८८ पर्यंत राहिले. रामजन्मभूमी चळवळीत दोन महिने तुरुंगात असलेले तीरथ यांनी उत्तराखंड राज्य चळवळीत सक्रिय भूमिका बजावली.

विद्यार्थी जीवनात राजकारणात पाऊल ठेवले
तीरथ सिंह रावत यांनी गढवाल विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि त्यानंतर समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर पत्रकारिता विषयातील पदविका घेतली. श्रीनगर येथील गढवाल विद्यापीठाच्या बिर्ला कॅम्पसमध्ये शिकत असताना त्यांनी विद्यार्थींचे राजकरण सुरू केले. सन १९९२ मध्ये त्यांनी प्रथम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गढवाल विद्यापीठ बिर्ला कॅम्पस श्रीनगर येथील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली आणि विजयाची नोंदणी केली. यानंतर एबीव्हीपीच्या राज्य संघटनेच्या मंत्र्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आणि नंतर ते प्रदेश उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनले.

१९९७ साली एमएलसी आणि २००० मध्ये झाले मंत्री

१९९७ मध्ये ते उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडले गेले. त्यानंतर सन २००० मध्ये स्वतंत्र उत्तराखंडची uttarakhand स्थापना झाली तेव्हा तीरथ सिंह रावत हे राज्याच्या अंतरिम सरकारमध्ये उत्तराखंडचे पहिले शिक्षणमंत्री झाले. २००७ साली भाजपचे प्रदेश सरचिटणीस, राज्य सदस्यत्व, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार समितीचे अध्यक्ष म्ह्णून निवडले गेले. सन २०१२ मध्ये भाजपचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले, परंतु तीरथ सिंह रावत चौबट्टाखाल येथून विधानसभा जिंकू शकले.

भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतली हाती
तीरथ सिंह रावत दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर पक्षाने त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. २०१३ मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि २०१५ पर्यंत राहिले. सन २०१७ मध्ये आमदार म्हणून तिकीट कापल्यानंतर पक्षाने त्यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी हिमाचल प्रदेश प्रभाराची जबाबदारी सांभाळली. येथे त्यांनी लोकसभेच्या चार जागा जिंकल्या आणि पक्षातील स्वतःचे स्थान मजबूत केले. इतकेच नव्हे तर सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने गिरीवाल सिटीवरून तीरथ यांना उमेदवारी दिली आणि ते जिंकून संसदेत पोहाेचले आणि आज मुख्यमंत्रिपदाचा मुकुट त्यांच्या डोक्यावर शोभत आहे.

तीरथ सिंह रावत यांच्यासमोरील आव्हाने
पुढच्या वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. अशा परिस्थतीत विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा विजयी करून पुन्हा सत्तेत यावे, यासाठी सत्तेची कमांड तीरथ सिंह रावत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यापूर्वीही भाजपने दोनदा मुख्यमंत्री बदलण्याचा प्रयोग केला होता; परंतु त्यांना यश आले नाही. म्हणूनच हे भाजपसाठी तेवढे सोपे नाही कारण फक्त एक वर्ष बाकी आहे.

भाजपने याआधीच्या सरकारांमध्ये जे बदल केले, त्यांना केवळ चार आणि सहा महिन्यांचा वेळ मिळाला होता. यावेळी आजून १ वर्ष बाकी आहे. विरोधकांत हरीश रावतशिवाय दुसरा मोठा चेहरा नाही. अशा परिस्थितीत पक्षाच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाविरोधात त्यांना भाजपच्या बाजूने करावे लागेल.

उत्तराखंडच्या uttarakhand राजकारणात कुमाऊं आणि गढवाल यांच्यातील राजकीय वर्चस्व कोणापासून लपलेले नाही. अशा परिस्थितीत कुमाऊं आणि गढवाल यांच्यात तीरथ सिंह रावत यांच्यासमोर समतोल राखण्याचे आव्हान असेल, त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांना आपले स्थान गमवावे लागले. अशा परिस्थितीत गढवाल प्रांतातून येणारे तीरथसिंग रावत कुमाऊंशी कसे संतुलन ठेवतात हे आता पाहावे लागणार आहे. याखेरीज काँग्रेसकडून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांसमवेत बॅलन्स ठेवावे लागेल आणि सोबत भाजपच्या आमदारांमधील नाराजगी दूर करावी लागेल.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

Gold Rates Today : सणासुदीमध्ये पुन्हा एकदा स्वस्त झालं सोनं-चांदी, 40 हजारांपेक्षा कमी होणार दर ? जाणून घ्या आजचे भाव

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

Related Posts