IMPIMP

Varsha Gaikwad | सोमवारपासून शाळा सुरू होणार ? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले ‘हे’ संकेत

by nagesh
Varsha Gaikwad | school will open as per schedule education minister varsha gaikwad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Varsha Gaikwad | राज्यात कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले शाळा आणि महाविद्यालये (Schools And Colleges) पुन्हा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला. मात्र आता पालक संघटनांकडून शाळा सुरू करा अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”पालक संघटनांकडून शाळा सुरू करा अशी मागणी होत असल्याने सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवणार आहे.” अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. वर्षा गायकवाड म्हणाल्या, ”सोमवारपासून शाळा सुरू करण्यात याव्यात असा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवणार आहोत. रुग्णसंख्या कमी होत आहे जी सकारात्मक गोष्ट आहे त्यामुळे पालक सतत शाळा सुरू करा अशी मागणी करत आहेत. नियम धुडकवून काहीही करणं चुकीचं आहे, पण मुख्यमंत्र्यांचा निर्णय येऊ द्या.” असं त्या म्हणाल्या.

 

 

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, ”लसीकरणावर अधिक भर देणार आहोत.
आरोग्य विभागाशी याबाबत चर्चा करण्यात येईल.
शाळेत लसीकरण केंद्र झाले तर लवकर लसीकरण पूर्ण होईल.
रात्रशाळांच्या बाबतीतही निर्णय घेऊ, अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.

 

 

Web Title :- Varsha Gaikwad | Maharashtra Education Minister Varsha Gaikwad gave a clear signal will school start from monday

 

हे देखील वाचा :

EPFO | 30 वर्षापेक्षा कमी वयात सुरू केली नोकरी आणि 18 हजारपेक्षा कमी असेल पगार तर निवृत्तीला किती मिळेल फंड, जाणून घ्या?

Rhea Chakraborty | अलिबागच्या ‘या’ व्हिलामध्ये रिया चक्रवर्ती करतेय तिचा क्वालेटी टाईम स्पेंड; एका रात्रीचा रेंट ‘एवढा’ की…

Tax Exemption In Budget | नोकरी करणार्‍यांसाठी खुशखबर ! मिळू शकतात ‘या’ 3 भेट

 

Related Posts