IMPIMP

Central Railway | मध्य रेल्वेत पदोन्नती आरक्षण लागू करण्याची मागणी, अन्यथा ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असोसिएशनचा मोर्चा काढण्याचा इशारा

by nagesh
Central Railway | Demand to implement promotion reservation in Central Railway, otherwise All India SC, ST Railway Employees Association warns of march

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Central Railway | भारतीय रेल्वेत काही विभागात रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती आरक्षण लागू करण्यात आले आहे. परंतु मध्य रेल्वेत ते अद्याप लागू करण्यात आलेले नाही. पदोन्नती आरक्षण हे मध्य रेल्वेत लागू करण्यात यावे नाही तर ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असोसिएशन तर्फे मुंबईतील मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजर यांचे कार्यालयावर प्रचंड संख्येने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे यांनी दिला आहे. (Central Railway)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुण्यात ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असोसिएशनची मध्य रेल्वे झोनलची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी झोनल सचिव सतिश केदारे, झोनल कार्यकारणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, हेमंत गाधले (मुंबई), सोलापूर मंडळ अध्यक्ष सचिन बनसोडे, संजय तपासे (सानपाडा), मुंबई मंडळ महिला अध्यक्ष माधुरी पडळकर, सुचित्रा गांगुर्डे (नाशिक), अशोक सुरवाडे (भायखळा), राजेश थोरात (मुंबई), नितीन वानखेडे (पुणे) आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे मंडलचे सचिव नितीन वानखेडे, कार्याध्यक्ष विशाल आहोळ आणि अति. सचिव दिनेश कांबळे, विश्वजीत कीर्तीकर यांनी केले. (Central Railway)

 

सदर वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव संमत करण्यात आले की,
झोनल व मंडळ कार्यकारणी सदस्यपदी सेवानिवृत्त कर्मचारी यांना झोनल व मंडल कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्त करण्यात येऊ नये,
भुसावळ येथे जी झोनलची बैठक झाली ती बैठक बेकायदेशीर होती.
त्यात घेण्यात आलेल्या निर्णयाचे खंडन करण्यात आले. बी. के. खोइया, हेमंत जाधव, अशोक खरे, टी.व्ही. वाघमारे
यांचे असोसिएशनचे प्राथमिक सदस्य नसल्याचे यावेळी घोषित करण्यात आले.
झोनल सचिव सतिश केदारे यांनी सन २०२२-२३ चा झोनल सचिवांचा अहवाल यावेळी सादर केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Central Railway | Demand to implement promotion reservation in Central Railway, otherwise All India SC, ST Railway Employees Association warns of march

 

हे देखील वाचा :

Ambadas Danve | ‘नागपूरचे पालकमंत्री गृहमंत्री असूनही नागपूरची कायदा सुव्यवस्था ढासळली’ – अंबादास दानवे

Ajit Pawar | ‘कोरोना’च्या संकटाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

Pune Crime | मित्राकडून उसने घेतलेले 1 कोटी 88 लाख परत न देणाऱ्या व्यावसायिकास अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

 

Related Posts