IMPIMP

Raj Thackeray | सोशल मिडीया वापरावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना खडे बोल; म्हणाले…

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | raj thackeray is visiting pune for the first time after issuing a leaflet for office bearers

सरकारसत्ता ऑनलाईन   मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे एक पत्र सध्या सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. यात त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट ताकिद देत पक्षाविषयी काही अधिकृत भूमिका सोशल मिडीयावर मांडण्याअगोदर वरिष्ठांशी बोलण्याचा सल्ला दिला आहे. (Raj Thackeray)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मिडीयावर काही गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या. अशा स्पष्ट शब्दात पक्षाबद्दल काहीही सोशल मिडीयावर टाकणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकीद दिली आहे. याबाबतचा मजकूर त्यांनी पत्रात लिहून ते पत्र सोशल मिडीयावर शेअर केलं आहे.

 

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘सध्या सोशल मिडीयावर जाऊन वाटेल ते बोलायचं, प्रसिध्दी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्या पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिध्दी आणि सोशल मिडीयाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचे काय करायचे हे त्यांनी ठरवावं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मी हे खपवून घेणार नाही. असे राज ठाकरे म्हणतात.

 

तसेच ते पुढे लिहतात, ‘माझ्या पक्षातील कोणालाही पक्षांतर्गत बाबींवर काही
म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्याशी बोला, माझ्याशी बोला.
पण हे सोडून थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मिडीयावर जाऊन गरळ ओकायची असेल
तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा.
पक्षात राहून असे प्रकार केले तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा.
ही समज नाही तर अंतिम ताकिद आहे ह्याची नोंद घ्या!’
अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना एकप्रकारे समज दिली आहे.
राज ठाकरे यांचे हे पत्र सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Raj Thackeray | mns raj thackeray letter to party activist to not use social media to discuss party affairs

 

हे देखील वाचा :

Central Railway | मध्य रेल्वेत पदोन्नती आरक्षण लागू करण्याची मागणी, अन्यथा ऑल इंडिया एससी, एसटी रेल्वे एम्पलाईज असोसिएशनचा मोर्चा काढण्याचा इशारा

Ambadas Danve | ‘नागपूरचे पालकमंत्री गृहमंत्री असूनही नागपूरची कायदा सुव्यवस्था ढासळली’ – अंबादास दानवे

Ajit Pawar | ‘कोरोना’च्या संकटाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

Pune Crime | मित्राकडून उसने घेतलेले 1 कोटी 88 लाख परत न देणाऱ्या व्यावसायिकास अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

 

Related Posts