IMPIMP

Vikram Gokhale | ‘त्या’वरून विक्रम गोखले संतापले; म्हणाले – ‘त्याबद्दल आपल्याला शरम वाटत नाही का?’

by nagesh
Vikram Gokhale | actor vikram gokhale clears his stand about statement support kangana ranaut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Vikram Gokhale | बाॅलीवुड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानावरुन देशभरातून कंगणावर टीका होऊ लागली. कंगणाच्या विधानाचं समर्थन जेष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी (Vikram Gokhale) केल्यावर त्यांच्यावरही जोरदार टीका होऊ लागली आहे. यावरुन आज (शुक्रवारी) विक्रम गोखलेंनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले, ‘2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आणि ते मी
मुळीच बदलणार नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मी त्या मूळ भाषणात असं म्हणालो की, ‘दे दी हमे आझादी बिना ढाल’.
म्हणजे विना तलवार आणि ढाल आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मग जे बाकीचे ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, फाशीवर चढले, ब्रिटिशांना गोळ्या घातल्या,
त्यांची अवहेलना झाली याची आपल्याला कोणालाच शरम वाटत नाही? त्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही? याचा मला राग आला, असं मत गोखलेंनी
मांडलं आहे.

 

दरम्यान, माझी कंगनाशी ओळख नसली, तरी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं
आहेत. ती आता सांगत बसत नाही. 18 मे 2014 रोजीचा गार्डियनचा अंक वाचा. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय. त्याची कॉपी माझ्याकडे
आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो. त्यावरून ताबडतोब बोंबाबोंब सुरू झाली, असं गोखले यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Vikram Gokhale | actor vikram gokhale clears his stand about statement support kangana ranaut

 

हे देखील वाचा :

Vikram Gokhale | ‘2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं मत मी बदलणार नाही’ – विक्रम गोखले

High Court | दोन धर्माच्या प्रौढ जोडप्याच्या वैवाहिक जीवनात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही – हायकोर्ट

Pune Crime | गाई चरण्यावरुन वनरक्षकाला बेदम मारहाण, 7 ते 8 जणांवर FIR

 

Related Posts