IMPIMP

Vikram Gokhale | ‘2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं मत मी बदलणार नाही’ – विक्रम गोखले

by nagesh
Vikram Gokhale | Great actor vikram gokhale hospitalized undergoing treatment at Deenanath Mangeshkar Hospital pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने काही दिवसांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी समर्थन केले होते. यामुळे विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर देशभरातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर आता विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू व आपले मत मांडले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषदेमध्ये मी कंगनाला ओळखत नाही आणि तिच्यासोबत मी कामही केलेलं नाहीये. भारतीय नागरिक आणि राजकीय
अभ्यासक म्हणून 2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं मत आहे आणि माझे हे मत मी बदलणार नाही असे ठामपणे सांगितले. तसेच मी कोणत्याही
स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केला नाही. 18 मे 2014 चा गार्डियन चा अंक वाचा. त्यात जे होतं तेच कंगना बोलली. कंगना काही चुकीचं बोलली नाही
इतकंच मी बोललो असंसुद्धा विक्रम गोखले (Vikram Gokhale) यावेळी म्हणाले. गेले-30-32 वर्ष असलेल्या पक्षांनी पण मला आमच्यात या अशी
ऑफर दिली, तुम्हाला काय हवं ते देतो पण मी गेलो नाही. भाजप (BJP) आणि शिवसेनेने (Shivsena) पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक
इच्छा असल्याचे विक्रम गोखले यांनी सांगितले आहे.

बॉलिवू़ड अभिनेत्री कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाचे विक्रम गोखले यांनी समर्थन केले होते. त्यावेळी कंगना रणावतच्या विधानाशी मी
सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत
अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होतं.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन.तसेच सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी (Devendra Fadanvis) माझ्याशी बोलताना मान्य केले आहे असे विक्रम गोखले यांनी सांगितले. तसेच राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी (Uddhav Thackeray) बोलेन अस देखील ते म्हणाले. आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे… आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील विक्रम गोखले म्हणाले आहेत.

 

Web Title : Vikram Gokhale | “I will not change my opinion that we got real independence from 2014” – Vikram Gokhale

 

हे देखील वाचा :

High Court | दोन धर्माच्या प्रौढ जोडप्याच्या वैवाहिक जीवनात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही – हायकोर्ट

Pune Crime | गाई चरण्यावरुन वनरक्षकाला बेदम मारहाण, 7 ते 8 जणांवर FIR

Jacqueline Fernandez | जॅकलीनने केला केसांसाठी ‘जुगाड’ अन् अक्षय कुमारने केला व्हिडीओ शेअर, पाहून सर्वच ‘हैराण’ (व्हिडिओ)

 

Related Posts