IMPIMP

Pune Crime | गाई चरण्यावरुन वनरक्षकाला बेदम मारहाण, 7 ते 8 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | Mangesh Kanchan arrested by Loni Kalbhor police for threatening two doctors and demanding Rs 30 lakh ransom

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | वनविभागाच्या (Forest Department) हद्दीमध्ये गाई चरण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून सात ते आठ जणांनी वनरक्षकाला (Forester) बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. याप्रकरणी 7 ते 8 जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसर येथील स.नं.68 वनविज्ञान केंद्र येथे बुधवारी (दि.17) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

विशाल यादव Vishal Yadav (वय-38 रा. रामोशीवाडी, गोखलेनगर, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यादव यांच्या फिर्यादीवरुन
पोलिसांनी 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यादव हे वन विभागामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीचे संरक्षण, रोपांचे संरक्षण व संवर्धन, अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. हडपसर येथील वनविज्ञान केंद्रामध्ये शासकीय कर्तव्यावर असताना गुरे चरण्यासाठी आरोपी आले होते. त्यावेळी त्यांनी हटकले. याचा राग आल्याने आरोपीने साथीदारांना बोलावून घेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन मारहाण (Pune Crime) केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट (PSI Chaitrali Gapat) करत आहेत.

Web Title : Pune Crime | crime against seven or eight people for beating a forest officer kondhwa police station

हे देखील वाचा :

Jacqueline Fernandez | जॅकलीनने केला केसांसाठी ‘जुगाड’ अन् अक्षय कुमारने केला व्हिडीओ शेअर, पाहून सर्वच ‘हैराण’ (व्हिडिओ)

MSRTC Privatization | महाराष्ट्र एसटी महामंडळाचे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खासगीकरण?

Sameer Wankhede | मलिकांच्या ‘त्या’ आरोपावरुन वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले – ‘वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच, ‘मी 2006 पासूनच…’

Related Posts