IMPIMP

Vinayak Mete | ‘विनायक मेटे यांच्या अपघातानंतरच्या घटनांची चौकशी करा’ – ज्योती मेटे

by nagesh
Vinayak Mete | what happened in two hours after accident this should be investigated demand of jyoti mete wife of vinayak mete

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसंग्रामचे अध्यक्ष (Shiv Sangram President) विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) मोटार अपघातात (Car Accident) मृत्यू झाला. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा (Bhatan Tunnel) ओलांडण्याआधी हा अपघात झाला. विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या मृत्यूनंतर (Death) विविध राजकीय नेत्यांनी दु: ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. या सर्व घडामोडीनंतर मेटे व त्यांच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे (Wife Jyoti Mete) यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातानंतर दोन तासांत काय घडलं ? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. बीडमध्ये एका वृत्तवाहीनीशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत संशय व्यक्त केला. अपघातानंतर काय घडलं याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

ज्योती मेटे म्हणाल्या, साहेबांशी बोलणं परवा झालं. त्यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट रोजी बैठक असल्याचं सांगितलं.
मी त्यांना रात्री प्रवास करु नका असं सांगितलं. त्यांना मी हेदेखील सांगितलं होतं की, पुण्यात मुक्काम करा आणि पहाटे निघा.
ते आमचं शेवटचं बोलणं. पुढे त्या म्हणाल्या, शेवटची भेट आमची गुरुवारी झाली. मी नाशिकहून मुंबईला गेले आणि त्यांना मुंबईहून बीडला यायचं होतं. त्यावेळी आम्ही नवी मुंबईपर्यंत एकत्र गेलो. त्यानंतर तिथून मी परत आले.

 

ज्योती मेटे यांनी सांगितले की, मी तिथे गेल्यावर त्यांची पल्स पाहिली. तिथे डॉक्टर होते.
मी त्यांना सांगितलं, मी त्यांची पत्नी आणि डॉक्टर आहे. त्यांनी मला परवानगी दिली. मी पल्स चेक केली,
त्यानंतर मानेची पल्स चेक केली. समोर ईसीजी फ्लॅट दिसत होता.
त्यावेळी मी माझ्या भावाला सांगितले, हे थोडा वेळात गेलेले नाहीत. अपघातानंतरच्या वेळेची चौकशी होणे आवश्यक आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  Vinayak Mete | what happened in two hours after accident this should be investigated demand of jyoti mete wife of vinayak mete

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar In Jalna | पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी महिलेनं थेट कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनाच अडवलं; जालन्यातील प्रकार

Hasin Jahan | मोहम्मद शमीच्या पत्नीचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाली – ‘देशाचं नाव बदलून…’

RIL Mukesh Ambani | ज्युनिअर अंबानींनी फडकावला ध्वज; मुकेश अंबानींनी कुटुंबासोबत साजरा केला स्वातंत्र्य दिन

 

Related Posts