IMPIMP

Virat Kohli | आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात विराट कोहली झाला ‘बोल्ड’; पाहा व्हिडीओ

by nagesh
Virat Kohli | Virat Kohli clean bold in his 100th Test match Watch the video

सरकारसत्ता ऑनलाइन – Virat Kohli भारत आणि श्रीलंकेमध्ये (IND vs SL) मोहाली येथे कसोटी (Test Match) सामना चालू आहे. हा कसोटी सामना भारताचा खेळाडू विराट कोहलीचा (Virat Kohli) 100 वा कसोटी सामना असल्याने प्रत्येक भारतीय विराटची बॅटींग पाहण्यासाठी आतुर होता. मात्र विराट 45 धावांवर बोल्ड आउट झाला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी चांगली सुरूवात करून दिली मात्र दोघे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी चांगली भागीदारी केली. विराट (Virat Kohli) आज शतक ठोकणार असं वाटत होतं. विराट आपल्या अर्धशतकापासून तो 5 धावा दूर म्हणजेच 45 धावांवर बाद झाला.

 

 

श्रीलंकेचा गोलंदाज एम्बुलडेनियाने (Ambuldenia) विराटला (Virat Kohli) आपलं शिकार बनवलं. विराट त्याचा चेंडू हुकला आणि स्टंम्प उडाले. त्यावेळी विराट कोहलीही अचंबित झाला होता आणि चेंडूकडे पाहत राहिला होता.

 

विराटसोबत खेळणाऱ्या हनुमा विहारीने (Hanuma Vihari) अर्धशतक (Half century) केलं मात्र 58 धावांवर तोही बाद झाला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या फलंदाजांपैकी श्रेयस अय्यर आणि पंत यांनी जोरदार खेळी केली.
श्रेयस बाद झाला मात्र पंतने आपली आक्रमक खेळी सुरू ठेवली होती. पंतचं अवघ्या 4 धावांनी शतक हुकलं.
रविंद्र जडेजा आणि आर. आश्विन खेळत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, सकाळच्या सुमरास सामना सुरू होण्याआधी विराट कोहलीला प्रशिक्षक राहुल द्रविडच्या (Coach Rahul Dravid) हस्ते शंभरावी ब्लू बॅगी कॅप देत त्याचा गौरव करण्यात आला.

 

Web Title :- Virat Kohli | Virat Kohli clean bold in his 100th Test match Watch the video

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | राज्यात विकेंडनंतर पुन्हा आस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून Alert

Post Office Saving Scheme | दर महिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक

Thyroid Control Diet | थॉयराईडचा स्तर वाढत असेल तर औषधांसोबतच ‘या’ 5 फूड्सचे करा सेवन, लवकरच होईल कंट्रोल

 

Related Posts