IMPIMP

Post Office Saving Scheme | दर महिना मिळतील 4,950 रुपये, केवळ एकदा करावी लागेल गुंतवणूक

by nagesh
Post Office Saving Scheme | savings post office savings schemes interest rates sukanya samriddhi yojana ppf kisan vikas patra

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPost Office Saving Scheme | रशिया – युक्रेन युद्धामुळे (Russia – Ukraine War) गेल्या अनेक आठवड्यांपासून शेअर बाजारात चढ – उतार पाहायला मिळत आहेत. अशा वेळी लोक गॅरंटीड रिटर्न स्कीम (Guaranteed Return Scheme) मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिसच्या अनेक गॅरंटीड रिटर्न स्कीम खूप लोकप्रिय आहेत. (Post Office Saving Scheme)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजने (Post Office Monthly Income Scheme) चा यात समावेश आहे. या योजनेतील गुंतवणुकीद्वारे दरमहा 4,950 रुपये मासिक उत्पन्न कसे मिळवता येईल ते जाणून घेवूयात…

 

किती करू शकता गुंतवणूक (Post Office MIS Investment)

या योजनेत किमान 1,000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. एका खात्यात कमाल 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. सर्व खातेदारांचा संयुक्त खात्यात समान हिस्सा असतो.

 

इतके मिळत आहे व्याज (POST Office MIS Interest Rate)

पोस्ट ऑफिसच्या या अतिशय लोकप्रिय योजनेतील गुंतवणुकीवर, तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज मिळते. रिटर्नचा हा दर बचत खात्यात किंवा मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेच्या तुलनेत जास्त आहे. (Post Office Saving Scheme)

या योजनेत गुंतवणूक केल्यावर ग्राहकाला दर महिन्याला व्याज मिळते. तुम्ही नुकतेच निवृत्त झाले असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरमहा असे मिळतील 4,950 रुपये (Post Office MIS Return)

सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळत आहे. अशा प्रकारे गणना केल्यास, असे दिसून येते की जर एका खातेदाराने जास्तीत जास्त 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला दरवर्षी 29,700 रुपये व्याज मिळेल.

अशा प्रकारे, एका खातेदाराला दरमहा 2,475 रुपये व्याज मिळेल. त्याच वेळी, संयुक्त खातेदाराला 9 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वार्षिक 59,400 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये संयुक्त एमआयएस खाते उघडले आणि 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 4,950 रुपये रिटर्न मिळेल.

 

जाणून घ्या मॅच्युरिटी कालावधी (Post Office MIS Maturity)

खाते उघडल्यानंतर पाच वर्षांनी विहित नमुन्यात अर्ज भरून आणि संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म सबमिट करून खाते बंद करू शकता.

त्याच वेळी, जर खातेदाराचा मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला, तर खाते बंद करून,
गुंतवणुकीची रक्कम नॉमिनीला किंवा खातेदाराच्या कायदेशीर वारसाला परत केली जाऊ शकते.
नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला देखील रिटर्न प्रक्रियेच्या महिन्यापर्यंत व्याज मिळेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Post Office Saving Scheme | post office monthly income scheme interest rate maturity and return

 

हे देखील वाचा :

Thyroid Control Diet | थॉयराईडचा स्तर वाढत असेल तर औषधांसोबतच ‘या’ 5 फूड्सचे करा सेवन, लवकरच होईल कंट्रोल

Devendra Fadnavis | कोर्टात दिलेल्या अहवालात ‘त्या’ गोष्टीचा उल्लेख नसल्याने मुख्यमंत्र्याचीही लाज गेली – देवेंद्र फडणवीस

PM Narendra Modi Pune Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी पवार, ठाकरे उपस्थित राहणार?

 

Related Posts