IMPIMP

Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; व्हिजन लायन्स् संघाला विजेतेपद !!

by nagesh
Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘Vision Cup Under’ Championship Under-15 Cricket Tournament; Vision Lions Team Champion!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ (Vision Cup Under-15 Cricket Tournament) अजिंक्यपद १५ वर्षाखालील टेव्न्टी-२० क्रिकेट स्पर्धेत उजव्या हाताचा ऑफ ब्रेक फिरकी गोलंदाज धवल देशपांडे याच्या अचूक गोलंदाजीच्या कामगिरीमुळे व्हिजन लायन्स् संघाने लेपर्डस् इलेव्हन संघाचा ९ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. (Vision Cup Under-15 Cricket Tournament)

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर झालेला अंतिम सामना कमी धावसंख्येचा आणि अधिक मानसिक दबावाचा ठरला. नाणेफेक जिंकून लेपर्डस् इलेव्हन संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्हिजन लायन्स् संघाने श्रेयस व्हावळे (३६ धावा), रणवीर मते (१७ धावा) आणि सायन पात्रा (१४ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर २० षटकामध्ये १०८ धावा धावफलकावर लावल्या. लेपर्डस् संघाच्या साहील कुलकर्णी याने भेदक गोलंदाजी करत ६ धावात ४ गडी टिपले आणि लायन्स् संघाच्या फलंदाजीला वेसण घातले.

फलंदाजीस उतरलेल्या लेपर्डस् इलेव्हन संघाने सावध सुरूवात केली. अदवय सोनावणे याने ४० धावा तर, वेदांत गावडे याने १२ धावा करून लेपर्डस् संघाला विजयाचा रस्ता दाखवला होता. पण लायन्स्चा फिरकीपटू धवल देशपांडे याने २३ धावात ३ गडी बाद करून लेपर्डस्च्या फलंदाजीला खिंडार पाडले. जयेश ओझा यानेही १५ धावात २ गडी बाद करत अचूक गोलंदाजी केली. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले व लेपर्डस् संघाचा डाव १८.२ षटकामध्ये ९९ धावांवर आटोपला आणि व्हिजन लायन्स् संघाने विजयश्री खेचून आणली.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या व्हिजन लायन्स् आणि उपविजेत्या लेपर्डस् इलेव्हन संघांना करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्तम फलंदाजाचा मान व्हिजन लायन्स्च्या रणवीर मते (२०८ धावा) याला मिळाला. सर्वोत्कृष्ट गोलंदाज अमोघ नातू (१३ विकेट, लायन्स्), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय शेडगे (जॅग्वॉर्स इलेव्हन) याला देण्यात आला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम सामनाः

व्हिजन लायन्स्ः २० षटकात ९ गडी बाद १०८ धावा (श्रेयस व्हावळे ३६, रणवीर मते १७, सायन पात्रा १४,
साहील कुलकर्णी ४-६) वि.वि. लेपर्डस् इलेव्हनः १८.२ षटकात १० गडी बाद ९९ धावा (अदवय सोनावणे ४०,
वेदांत गावडे १२, धवल देशपांडे ३-२३, जयेश ओझा २-१५); सामनावीरः धवल देशपांडे;

Web Title : Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘Vision Cup Under’ Championship Under-
15 Cricket Tournament; Vision Lions Team Champion!

Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा;
लिंजडस् स्पोर्ट्स क्लब, युनायटेड इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत!

Pune Crime News | Wanwadi Police Station : वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या,
10 वाहने हस्तगत

RBI Governor Shaktikanta Das | 2000 रुपयांच्या नोटबंदीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया,
म्हणाले -‘…म्हणून नोटा बंद केल्या’ (व्हिडिओ)

Related Posts