IMPIMP

Vivek Oberoi | बॉलिवूडवर अभिनेता विवेक ओबेरॉयने केले मोठे विधान; “त्यांनी माझं करिअर उद्ध्वस्त…”

by nagesh
Vivek Oberoi | vivek oberoi says most powerful people from bollywood literally sabotaged his career

सरकारसत्ता ऑनलाईन – ‘साथीया’,‘कंपनी’सारखे लागोपाठ हिट चित्रपट बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) दिले आहेत. यानंतर अचानकच काही काळ ते चित्रपटसृष्टीतून गायब झाले होते. मात्र पुन्हा एकदा ‘शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला मधून त्यांनी कमबॅक केले आणि आता त्यांचा एमएक्स प्लेअरच्या ‘धारावी बँक’ या वेब सिरीज नंतर त्यांना जास्तच प्रसिद्धी मिळत आहे. या वेब सिरीजमधील त्यांच्या कामामुळे प्रेक्षक त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत. याच दरम्यान एका मुलाखतीत विवेकनी (Vivek Oberoi) बॉलीवूडमधील एकंदरीत त्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला आणि यावेळी त्यांनी काही मोठ्या लोकांनी त्यांचे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला यावरही वक्तव्य केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिलेला विवेक अचानकच काही वादग्रस्त गोष्टींमध्ये अडकत गेला. त्यावेळी त्याची ऐश्वर्या राय सोबत जवळीक होती आणि ऐश्वर्याच्या एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच सुपरस्टार सलमान खानने त्याच्यासोबत केलेल्या गैरवर्तणूकीमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर बऱ्याच काळाने तो शूटआऊट अ‍ॅट लोखंडवालामधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला. विवेक (Vivek Oberoi) जेव्हा अडचणीत होता तेव्हा त्याच्या कुटुंबांनी देखील त्याला साथ दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

पुढे बोलताना तो म्हणाला, “मला माझ्या कुटुंबाचा खूप अभिमान आहे.
माझ्या प्रत्येक खडतर प्रवासात त्यांनी मला साथ दिली आहे.
चित्रपटसृष्टीत बरीच मोठी आणि शक्तिशाली मंडळी आहे. ज्यांनी माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला.
माझे करिअर उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला सारख्या चित्रपटातून मी
पुन्हा एकदा कम बॅक करून माझ्या कामातून त्यांना उत्तर दिले.
या चित्रपटानंतर तब्बल दीड वर्ष माझ्याकडे काहीच काम नव्हते.
एक अभिनेता म्हणून मी यशस्वी होतो. निर्माते प्रेक्षक यांच्याकडून मला भरभरून कौतुक मिळायचे.
मात्र तरीही माझ्याकडे काही काम नव्हतं. आता मला याबद्दल काही बोलायचं नाही किंवा कोणाविषयी माझ्या
मनात रागही नाही. जे झालं गेलं ते गंगेत मिळालं असंच म्हणावं लागेल.
ओटीटीसारखी सुवर्णसंधी हातात असताना मला फक्त आता माझ्यासाठी आणि माझ्या प्रेक्षकांसाठी काम
करायचे आहे. विवेकच्या धारावी बॅक या सिरीज मध्ये अभिनेता सुनील शेट्टी देखील मुख्य भूमिका साकारत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vivek Oberoi | vivek oberoi says most powerful people from bollywood literally sabotaged his career

 

हे देखील वाचा :

Kane Williamson Steps Down | केन विल्यमसनने सोडले कसोटी कर्णधारपद, ‘हा’ खेळाडू सांभाळणार न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा

Pune Bogus NA Order | पुण्यात बोगस NA ऑर्डर लावून दस्त नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करा, रोहन सुरवसे पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन

Tejaswini Pandit | अभिनेत्री तेजस्विनी पंडितने दुनियादारी चित्रपटाबद्दल केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

 

Related Posts