IMPIMP

WhatsApp Facebook Meta | बदलले WhatsApp चे डिझाईन, आता दिसू लागले Facebook चे नवीन नाव Meta

by nagesh
WhatsApp Facebook Meta | whatsapp design changed as facebook rebranding meta starts showing on android ios mark zuckerberg

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp Facebook Meta | सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकच्या नावात आणि लोगोत झालेल्या बदलानंतर (Facebook changed Name and Logo) आता व्हॉट्सअपच्या डिझाईनमध्ये सुद्धा बदल दिसून लागला आहे. आता संपूर्ण फेसबुक ब्रँडचे नाव मेटा (WhatsApp Facebook Meta) झाले आहे. मात्र, नवीन नाव केवळ पॅरेंट कंपनी फेसबुकला दिले गेले आहे.

 

फेसबुकच्या सर्व कंपन्यांच्या नावात कोणताही बदल झालेला नाही.
तरी सुद्धा कंपनीच्या नावात-लोगोत केलेल्या बदलाचा परिणाम त्यांच्या सहयोगी कंपन्यांवर दिसण्यास सुरूवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअपला आपल्या डिझाईनमध्ये (WhatsApp Facebook Meta) बदल करावा लागला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सर्व व्हॉट्सअप यूजर्ससाठी बदल नाही

 

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअप सुरूकरताना यूजर्सला स्क्रीनवर व्हॉट्सअप फ्रॉम फेसबुक (WhatsApp from Facebook) लिहिलेले दिसत होते.
आता यूजर्सला नवीन लाईन व्हॉट्सअप बाय मेटा (WhatsApp by Meta) दिसत आहे.

 

सध्या हे सर्व व्हॉट्सअप यूजर्ससाठी जारी केलेले नाही. डब्ल्यूएबीटॅन्फो (WABetaInfo) च्या रिपोर्टनुसार, हे व्हॉट्सअपच्या बीटा व्हर्जनवर आणले आहे.
जे लवकरच स्टेबल व्हर्जनवर सुद्धा येईल.

 

Metaverse वरून घेतले फेसबुकचे नवीन नाव

 

फेसबुकने मेटा हे आपले नवीन नाव मेटाव्हर्स (Metaverse) वरून घेतले आहे.
मेटाव्हर्सद्वारे लोक व्हर्च्युअल रियलिटी हेडसेटचा वापर करून एका अभासी जगात भेट, काम आणि खेळू शकतात.
मेटाव्हर्स एक व्हर्च्युअल कम्प्युटर जनरेटेड स्पेस आहे.

 

जगभरातील तंत्रज्ञान कंपन्या यावेळी मेटाव्हर्समध्येच भविष्य शोधत आहेत.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी जुलै 2021 मध्ये अर्निंग कॉलमध्ये म्हटले होते की, कंपनीचे भविष्य मेटावर्समध्ये आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तज्ज्ञांचे मेटाव्हर्सबाबत संमिश्र मत

 

तज्ज्ञांचे मत आहे की, हे भविष्यातील इंटरनेट असू शकते. यामध्ये व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि दुसरी टेक्नॉलॉजी मिळून चर्चा वेगळ्या स्तरावर पोहचेल.
काही तज्ज्ञांना याबाबत चिंता वाटत आहे. त्यांना वाटते की, या तंत्रज्ञानाद्वारे खुप मोठ्या प्रमाणात खासगी माहिती कंपन्यांपर्यंत पोहचू शकते.
यामुळे वैयक्तिकतेची मर्यादा पूर्णपणे नष्ट होईल. तसेच, कंपन्या याचा हवा तसा वापर करू शकतील. (WhatsApp Facebook Meta)

 

Web Title : WhatsApp Facebook Meta | whatsapp design changed as facebook rebranding meta starts showing on android ios mark zuckerberg

 

हे देखील वाचा :

Pandharpur Crime | पंढरपूर हादरलं ! 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, 3 आरोपींना इंदापूरमधून अटक

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 44 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात रिमोट कंट्रोलव्दारे वीज चोरीचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts