IMPIMP

Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी मौन सोडले, म्हणाले ‘8 जूनच्या रात्री…’

by nagesh
Aaditya Thackeray | shivsena thackeray faction leader aaditya thackeray spoke about where he was when disha salian died in mumbai

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत रिया चक्रवर्ती प्रकरण उकरून काढले आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली. त्यानंतर गुरुवारी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दिशा सालियन प्रकरणाला वाचा फोडली. त्यांनी देखील आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. तसेच आदित्य ठाकरेंची दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. त्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मौन सोडत आता यावर भाष्य केले आहे. तसेच ठाकरेंनी ते 8 जून 2020 रोजी कुठे होते, हे देखील स्पष्ट केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दिशा सालियन हिचा मृत्यू झाला त्या दिवशी म्हणजे 8 जून 2020 च्या रात्री मी रुग्णालयात होतो. आजोबांवर (रश्मी ठाकरेंचे वडील) रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे मी त्या ठिकाणी होतो, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिले. सभागृहात आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यावर त्यांना उत्तर देता येत नाहीत, म्हणून भाजप आणि शिंदे गटाचे लोक असे आरोप करत आहेत. आमच्यावर चौकशा लावण्याच्या मागण्या करत आहेत. सरकारला विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकायचे नाही. आमच्यावर कितीही चौकशा लावल्या तरी आम्ही डगमगणार नाही, असे ठाकरे म्हणाले.

 

एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो. त्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करतात.
या प्रकरणात दोनदा तपास अधिकारी बदलला जातो. 8 जूनच्या रात्री पार्टीला कोण कोण उपस्थित होते,
कुणाच्या राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडपण्यात आले, सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले,
त्या रात्री कुठला मंत्री त्या पार्टीत हजर होता, काहीतरी लपविण्यासाठी विरोधक गोंधळ घालत आहेत का,
दिशाच्या इमारतीच्या विसीटर बूकची पाने का फाडलेली आहेत, असे प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केले होते.
तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) नार्को टेस्ट करा,
अशीही मागणी राणेंनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास विशेष तपास
पथकाद्वारे (एसआयटी) करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Web Title :- Aaditya Thackeray | shivsena thackeray faction leader aaditya thackeray spoke about where he was when disha salian died in mumbai

 

हे देखील वाचा :

Mukta Tilak Funeral | आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sanjay Raut | ‘… म्हणून बोम्मईंची जीभ चालते आहे’ – बोम्मईंना संजय राऊतांचे प्रत्त्युतर

Army Jawans Killed In Road Accident | सिक्कीमध्ये लष्कराची बस दरीत कोसळली; 16 भारतीय जवानांचा मृत्यू

Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत ; पाकिस्तानी चाहता झाला खूश

 

Related Posts