IMPIMP

Winter Session -2022 | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबतचा अहवाल आठवडाभरात सादर करा, मुख्यमंत्र्यांचे पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

by nagesh
CM Eknath Shinde | Chief Minister Eknath Shinde's directive to provide necessary facilities to the followers coming to Chaityabhoomi

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Winter Session -2022 | पुणे येथील भिडे वाडा (Bhide Wada Pune) याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. (Winter Session -2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session -2022) काल विधानसभेत यासंदर्भात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी (National Memorial) बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.

 

यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे (Atul Save), आमदार छगन भुजबळ,
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Pune Collector Rajesh Deshmukh), महापालिका आयुक्त विक्रमकुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी आमदार भुजबळ यांनी या राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे तसेच त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात याबाबत सूचना केल्या.

 

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला प्राधान्य सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे
यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी.
आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
स्मारकाच्या कामाला कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा,
असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Winter Session -2022 | Submit the report on the construction of Krantijyoti Savitribai Phule Memorial within a week, Chief Minister’s instructions to Pune Collector, Municipal Commissioner

 

हे देखील वाचा :

Rahul Shewale On Aaditya Thackeray | सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात…

Kirit Somaiya | उद्धव ठाकरेंना 19 बंगल्यांचा हिशोब द्यावाच लागेल – किरीट सोमय्या

Anushka Sharma | अनुष्का शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण…

 

Related Posts