IMPIMP

Anushka Sharma | अनुष्का शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण…

by nagesh
Anushka Sharma | anushka sharma the petition was rejected by high court

सरकारसत्ता ऑनलाईन  –  बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहते. त्यातच आता अनुष्का ही एका नव्या कारणाने समोर आली आहे. एका प्रकरणामध्ये अनुष्का शर्माला मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. तसेच अनुष्का शर्माची (Anushka Sharma) याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. नुकतीच अनुष्का शर्मा ‘पुमा’ या नामांकित स्पोर्टस् वेअर ब्रँडमुळे चर्चेत आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुमाने अनुष्काची (Anushka Sharma) परवानगी न घेता तिचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते. ही गोष्ट अनुष्काच्या लक्षात आल्यावर अनुष्काने (Anushka Sharma) त्या कंपनीला आपले फोटो त्यांच्या सोशल मिडीया हँडल्सवरून हटवायला सांगितले होते. मात्र हा फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचे नंतर समोर आले. त्यानंतर आता परत अनुष्का चर्चेत आली आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाने अनुष्का शर्माला (Anushka Sharma) झटका दिला आहे. अनुष्काच्या विक्रीकर सल्लागाराने विक्रीकर आदेशाविरूध्द मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. मात्र आता विक्रीकर आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

 

काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्र मुल्यवर्धित कर कायद्याअंतर्गत २०१२-१३ आणि २०१३-१४ मूल्यांकन वर्षाची थकबाकी वाढवण्याचा माझगावच्या विक्रीकर उपायुक्तांनी दिलेल्या आदेशांना अनुष्का शर्माने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
मात्र याप्रकरणी दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावत अनुष्का शर्माला
जोरदार धक्का दिला आहे. इतकचं नाही तर ही याचिका अनुष्का शर्मा यांनी स्वतः न दाखल करत आपल्या
कर सल्लागारामार्फत दाखल केल्यामुळे कोर्टाने अनुष्का शर्मांवर नाराजी व्यक्त केली आहे.
या याचिका याचिकाकर्त्याच्या सल्लागाराने दाखल केल्या आहेत.
त्याचप्रमाणे अनुष्का या याचिका गंभीर प्रतिज्ञापत्रावर दाखल करू शकत नाहीत असे कोणतेही कारण नाही असे
मत न्यायमूर्ती नितीन जामदार आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने मांडले आहे.

त्यामुळे याप्रकरणात अनुष्का शर्माला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anushka Sharma | anushka sharma the petition was rejected by high court

 

हे देखील वाचा :

Suhana Khan | शाहरूखची मुलगी सुहाना पदार्पनाअगोदरच झाली ट्रोल; चाहते म्हणाले अरे ही तर…

IPS Officer Rashmi Shukla | रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने पुणे पोलिसांचा ‘तो’ रिपोर्ट फेटाळला

Rohit Pawar | सभागृहात ऊर्जामंत्र्यांच्या भाषणालाच वीज गेली आणि रोहित पवारांनी लगावला खोचक टोला

 

Related Posts