IMPIMP

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

by nagesh
Women Asia Cup 2022 | indian women cricket team beat srilanka in asia cup final and creates history

सिल्हेट-बांगलादेश : वृत्तसंस्था – महिलांच्या आशिया कपमध्ये (Women Asia Cup 2022) टीम इंडियाने श्रीलंकेच्या (srilanka) टीमचा धुव्वा उडवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. बांगलादेशच्या सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Sylhet International Stadium) झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने हा पराक्रम केला. या सामन्यात भारताने एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या (Women Asia Cup 2022) तिहासात सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रेणुका सिंगचं भेदक आक्रमण

या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर श्रीलंकेने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय गोलंदाजानी सामन्यावर वर्चस्व निर्माण करत श्रीलंकेला अवघ्या 65 धावात रोखलं. या सामन्यात वेगवान गोलंदाज रेणुका सिंगनं (Renuka Singh) आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेची मधली फळी कापून काढली. तिनं 3 ओव्हरमध्ये एका मेडन ओव्हरसह केवळ 5 धावा देताना 3 विकेट्स काढल्या. त्यानंतर राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gaikwad) (2/16) आणि स्नेह राणानं (Sneh Rana) (2/13) त्यांना उत्तम साथ दिली. भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेला 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 65 धावाच करता आल्या. यानंतर भारताने स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकाच्या जोरावर हे लक्ष्य 8.3 ओव्हर्समध्ये पार केलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टीम इंडियाचे आशिया कपमध्ये वर्चस्व

2004 पासून आतापर्यंत आशिया कपमध्ये (Women Asia Cup 2022) त्येकवेळी भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे.
आतापर्यंत झालेल्या 8 पैकी आठही स्पर्धांमध्ये भारतीय संघानं फायनल गाठली होती.
पण 2018 सालचा अपवाद वगळता भारतीय संघानं उर्वरित सातही स्पर्धांमध्ये आशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे.

 

 

श्रीलंका पुन्हा अपयशी

आशिया कपमध्ये श्रीलंकन महिला संघ पुन्हा अपयशी ठरला.
कारण स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात श्रीलंकेनं आजवर पाच वेळा स्पर्धेची फायनल गाठली होती.
पण पाचही वेळा श्रीलंकन संघाला भारताकडूनच पराभव स्वीकारावा लागला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Women Asia Cup 2022 | indian women cricket team beat srilanka in asia cup final and creates history

 

हे देखील वाचा :

Prakash Ambedkar | अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, प्रकाश आंबेडकर म्हणाले – ‘आमच्याकडे कोणीही…’

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

Shalini Thackeray | शालिनी ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांची उडवली खिल्ली, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे…!

Womens Asia Cup | टीम इंडिया सातव्यांदा आशिया चषक जिंकणार कि श्रीलंका इतिहास रचनार?

 

Related Posts