IMPIMP

Womens Asia Cup | टीम इंडिया सातव्यांदा आशिया चषक जिंकणार कि श्रीलंका इतिहास रचनार?

by nagesh
 Womes Asia Cup | womens t20 asia cup team india who are strong contenders for the title are all set to win the asia cup for the seventh time

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Womes Asia Cup | आजचा दिवस आशियाई क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचा आहे. बांगलादेशातील (Bangladesh) सिल्हेट या ठिकाणी महिला आशिया चषकाचा (Womes Asia Cup) आज अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली 6 वेळचा चॅम्पियन भारतीय संघ सातव्या विजेतेपदावर नाव कोरणार कि या स्पर्धेच्या टी-20 स्वरूपातील बदलानंतर प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेला श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ विजेतेपद मिळवून इतिहास रचणार.

 

याअगोदर श्रीलंकेच्या पुरुष संघाने गेल्या महिन्यात आशिया चषकाचे (Asia Cup) विजेतेपद पटकावले होते. उपांत्य फेरीत भारताने थायलंडचा आणि श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत समावेश केला आहे. सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवत पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला होता. टीम इंडियाचे पारडे सध्या जड आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हे दोन्ही संघ आतापर्यंत 22 वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यामध्ये भारताने 17 वेळा विजय मिळवला असून श्रीलंकेने फक्त चार सामने जिंकले आहेत तर एका सामना अनिर्णित राहिला आहे.
आतापर्यंत आशिया चषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामने झाले असून ते सर्व भारताने जिंकले आहेत.
त्याचबरोबर भारत सलग आठव्यांदा आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
तर श्रीलंका पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी 14 वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. (Womes Asia Cup)

 

 

या स्पर्धेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, एस मेघना, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा,
रिचा घोष (यष्टीरक्षक), डेलन हेमलता, स्नेह राणा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, किरण नवगिरे आणि पूजा वस्त्रकार.

 

श्रीलंका संघ : चमारी अटापट्टू (कर्णधार), निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहरी, अचिनी कुलसूरिया, सुगंधा कुमारी,
हर्षिता समरविक्रमा, मधुसिका मेथानंदा, हसिनी परेरा, ओधाडी रणसिंघे, इनोका रणविरा, अनुष्का संजीवनी, मालाना नुशाहनी, कौशानी नुशाहनी, मालाशनी शेंगा.

 

Web Title :- Womes Asia Cup | womens t20 asia cup team india who are strong contenders for the title are all set to win the asia cup for the seventh time

 

हे देखील वाचा :Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

Swords and Shield Symbol | शिंदेंचे चिन्ह वादात; ’ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध

Shanikrupa Heartcare Centre | अ‍ॅन्जिओप्लास्टी नाही, बायपास नाही, विनाशस्त्रक्रिया हृदयरोगावरील उपचार फक्त शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये

Nitin Gadkari | गडकरींनी काढली परखड शब्दांत खरडपट्टी, म्हणाले – ‘आमदार, खासदार, अधिकार्‍यांकडून विकासकामांत अडथळा’

Related Posts