IMPIMP

Nilesh Rane | निलेश राणेंची जीभ पुन्हा घसरली, भास्कर जाधवांना म्हणाले बिनकामाचा बैल, जयंत पाटील, अजित पवारांवर केली टीका

by nagesh
Nilesh Rane | bjp nilesh rane protest with supporters at ratnagiri hatavli toll naka

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांची जीभ पुन्हा घसरली आहे. ठाकरे कुटुंबियांवर केलेल्या अत्यंत खालच्या स्तराच्या टीकेनंतर निलेश राणे यांनी आता शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावरही खालच्या स्तराची टीका केली आहे. भास्कर जाधव हे बिनकामाचा बैल आहेत, तर जयंत पाटील (Jayant Patil) हवेत गोळीबार करतात, असे वक्तव्य राणे यांनी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निलेश राणे यांनी म्हटले की, भास्कर जाधव कार्टूनच आहे. आम्ही त्यांना बैल म्हणतो. तळ कोकणात त्यांना बिनकामाचा बैल म्हणतात. येत्या सोमवारी चिपळूणमध्ये सभा घेऊन भास्कर जाधव यांची पोलखोल करणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) टीका करताना निलेश राणे म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाला काही काम नाही का? कोण खुश कोण ना खुश यावर राष्ट्रवादीचे लक्ष आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगार झाली का? सतत सरकारच्या कामावर बोलणे योग्य नाही. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) चांगले काम करत आहे. जयंत पाटील काहीही बोलत असतात. हवेत गोळीबार करत असतात. राष्ट्रवादीवाले अख्खा दिवस भाजपमध्ये (BJP) काय चाललंय हेच बघत असतात.

 

राणे (Nilesh Rane) म्हणाले, अंधेरी पोट निवडणुकीमध्ये (Andheri By Election) भाजपचाच विजय नक्की आहे. ठाकरे सरकार (Thackeray Government) सुद्धा संख्याबळावरती होते. संख्या होती म्हणून महाविकास आघाडीमधले (Mahavikas Aghadi) सगळे कावळे एकत्र आले होते.

 

निलेश राणे पुढे म्हणाले की, अजित पवार सध्या विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना बिन पगाराच बोलावं लागतं.
अजित पवार यांचा विरोधी पक्ष नेते म्हणून राज्यात प्रभाव नाही. म्हणून ते मध्ये-मध्ये काहीतरी बोलत असतात.
अजित पवार यांची विरोधी पक्ष नेते म्हणून महाराष्ट्रात सध्या चर्चा नाही.
सध्या राज्याला विरोधी पक्ष नेता आहे की नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nilesh Rane | nilesh rane on jayant patil bhaskar jadhav kokan bjp ncp shivsena

 

हे देखील वाचा :

Shalini Thackeray | शालिनी ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांची उडवली खिल्ली, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे…!

Womens Asia Cup | टीम इंडिया सातव्यांदा आशिया चषक जिंकणार कि श्रीलंका इतिहास रचनार?

Chandrashekhar Bawankule | राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत, चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

Swords and Shield Symbol | शिंदेंचे चिन्ह वादात; ’ढाल-तलवार’ चिन्हाला शीख समाजाचा विरोध

 

Related Posts