IMPIMP

Yerwada Jail News | येरवडा कारागृहात गजा मारणे टोळीचा राडा ! दुसर्‍या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात घातला पाट

by nagesh
Yerwada Jail News | Yerwada Jail beating the gang's cry! Another gang's goon was hit in the head

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Yerwada Jail News | मोक्का MCOCA (Mokka Action) अन्वये कारागृहात जेरबंद असलेल्या कुख्यात गजा मारणे टोळीतील गुंडांनी बुधवारी रात्री येरवडा कारागृहात राडा घातला (Pune Crime News). दुसर्‍या टोळीतील गुंडाच्या डोक्यात पाट घालून त्याला जखमी केले. (Yerwada Jail News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

येरवडा कारागृहात (Yerwada Jail News) राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील मोक्का कायद्याखाली कारवाई झालेल्या कैद्यांना ठेवण्यात आले आहे.
या कैद्यांच्या टोळ्यांना वेगवेगळे ठेवण्याचा कारागृह अधीक्षकांचा प्रयत्न असतो.
वर्षानुवर्ष कारागृहात बंद असल्याने छोट्या छोट्या कारणावरुन त्यांच्यात कुरबुरी, वादावादी सुरु असतात.
कारागृहात बुधवारी दुपारी कॅरम खेळत असताना गजा मारणे (Gangster Gaja Marne) टोळीतील गुंडांचा
दुसर्‍या टोळीतील गुंडांशी वाद झाला. दोघेही हमरीतुमरीवर आले होते. तेथील जेल रक्षकांनी त्यांना बाजूला करुन
तो वाद तेथे मिटविला होता. त्यानंतर रात्री हजेरी घेतली जात असताना एकाच बराकीत असलेल्या या गुंडांमध्ये
पुन्हा वाद सुरु झाला. एकमेकांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी एका गुंडाने दुसर्‍या गुंडाच्या डोक्यात पाट घातला. त्यात तो जखमी झाला.

या घटनेनंतर जेल सुरक्षा यंत्रणेने या गुंडांना वेगवेगळ्या बराकीमध्ये हलविण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Yerwada Jail News | Yerwada Jail beating the gang’s cry! Another gang’s goon was hit in the head

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘तोपर्यंत सरकारला धोका…’

ED Notice To NCP Leader Jayant Patil | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; 4 वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती

Maharashtra Political Crisis | ‘आधी निकाल येऊ द्या, मग आपले ज्ञान पाजळा’- संजय शिरसाट

 

Related Posts