IMPIMP

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, ‘हे’ पाऊल उचललं

by pranjalishirish
Rajesh Tope | corona is growing tno reason to worry citizens should be careful in the rainy season maharashtra health minister rajesh tope

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोनाचा Corona  संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून अधिसूचना देखील काढली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनचा पुरवठा 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती 30 जून 2021 पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राज्यात कोरोना Corona  बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढवण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

राज्यात कोरोनाच्या  Corona रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा अधिनियमानुसार आरोग्य विभागाने राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सिजन पैकी 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी तर उर्वरीत 20 टक्के औद्योगिक वापरासाठी पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य देत 80 टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासली तर त्याचा पुरवठा करावा लागेल, असे निर्देश या अधिसूचनेत देण्यात आले आहेत.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

आरोग्य विभागाने काढलेल्या या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याकरीता राज्यस्तरावर आरोग्य आयुक्त आणि अन्न औषध प्रशासन आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. क्षेत्रीय स्तरावर विभागीय आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने काढलेली ही अधिसूचना 30 जून 2021 पर्यंत लागू राहणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास सांनी म्हटले आहे.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts