IMPIMP

महिला दिनानिमित्त मोठी घोषणा; विद्यार्थिनींना देण्यात येणार मोफत बससेवा

by amol
free bus service for girls student in rural area

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प जाहीर केला. कोरोनाच्या काळात सादर करण्यात Free bus service आलेल्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. आजच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुलींसाठी मोठी घोषणा केली. विद्यार्थिनींना एसटीच्या प्रवासासाठी Free bus service पैसे खर्च करावे लागणार नाहीत. आता यापुढे बसचा प्रवास मुलींसाठी मोफत करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात आता मुलींना मोफत बससेवा Free bus service पुरवण्यात येणार आहे. यामुळे बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बससेवेचा लाभ घेता येणार आहे.

आरोग्य सेवांसाठी तरतूद
आजच्या अर्थसंकल्पात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवांसाठी ७५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबर सरकारी रुग्णालयांमध्ये आगरोधक उपकरणे लावण्यात येणार आहेत. तसेच या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

शेतीसाठी तरतूद
कोरोना काळात औद्योगिक क्षेत्रात घट झाली असली तरी बळीराजाने मात्र सरकारला तारलं आहे. तसेच शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच तीन लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले त्यांना शून्य़ टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येणार आहे. तसेच यावरील व्याज राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे. कर्जमुक्तीनंतर ४२ हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले आहे असे स्पष्ट केले आहे. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी महावितरणला १५०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. तसेच विकेल ते पिकेल योजनेसाठी २१०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठांना कृषी संशोधनासाठी दरवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…
महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी
महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Related Posts