IMPIMP

कोल्हापुरात चिअर गर्ल्सचा राडा, ऊस वाहतूकदारांकडून ‘सोशल डिस्टेन्सिंग’चा फज्जा

by pranjalishirish
kolhapur-sugar-cane-factory-celebration-with-cheer-girls-violate-social-distancing-and-corona-rule

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना Corona व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोनाचा Corona  वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च या कालावधीत लॉकडाउन करण्यात आले आहे, तर आज पुण्यात झालेल्या बैठकीत पुण्यामध्ये आज (शुक्रवार) रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये, विनामास्क बाहेर फिरू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, राज्य सरकारच्या नियमांना पयदळी तुडवण्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भोगावती साखर कारखान्याच्या हंगामाची सांगता करताना हळदी परिसरात ट्रॅक्टर चालक आणि ऊसतोड कामगारांनी राडा घातला. डॉल्बीच्या ठेक्यावर चिअर गर्ल्स नाचवल्या. कोल्हापूर-राधानगरी रोडवर गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हा गोंधळ सुरू असताना सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी मुख्य रस्त्यावर स्टेज तयार करून डॉल्बीच्या ठेक्यावर चिअर गर्ल्स नाचवल्या. दारूच्या नशेतील ऊसतोड कामगार आणि तरुणही त्यांच्यासोबत नाचत होते. हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. हा प्रकार पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोनामुळे Corona  राज्यात अनेक कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहे, तर दुसरीकडे असा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार व्यक्तींवर पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Birthday SPL : ‘या’ शोमुळं बदललं होतं ‘सिंगर’ श्रेया घोषालचं आयुष्य ! 6 वर्षांनंतर होतेय आई

Related Posts