IMPIMP

अंबानी प्रकरण : ‘माझी मानसिक स्थिती ठीक नाही’, कारमालक मनसुखचं मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र

by nagesh
Hiren Mansukh

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मुंब्रा येथील रेतीबंदर या ठिकाणी मृतावस्थेत सापडला आहे. हिरेन मनसुख असं त्यांचं नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. हिरेन मनसुख यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात वर्तवला आहे. दरम्यान हिरेन यांनी त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं लेखी पत्र पोलिसांना दिल्याचं समजत आहे.

गुरुवारी रात्री पावणे आठच्या सुमारास मनसुख हिरेन यांचा मुलगा नेहमीप्रमाणे दुकानात जेवणाचा डब्बा घेऊन आला. जेवण उरकून साडे आठच्या सुमारास मुलाला दुकानातच थांबवून मनसुख यांनी मी बाहेर जाऊन येतो असं सांगितलं आणि ते दुचाकीवरून गेले होते अशी माहिती त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं दिली आहे.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर संशयास्पद स्थितीत सापडलेल्या कारबाबत कारमालकाची चौकशी सुरू होती. मात्र मानसिक स्थिती ठिक नसल्याबाबत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मनसुख हिरेन यांनी लेखी पत्र दिलं असल्याचं समजत आहे.

ठाण्यातील नौपाडा येथे ते वास्तव्यास होते. आज सकाळी 10.25 मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आज दुपारी मनसुख बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली होती.

जी स्कॉर्पिओ अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडली होती तिचा चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक घासून काढण्यात आला होता.
मात्र वाहन जुने असल्यानं काचेवर असलेल्या क्रमांकावरून तिची ओळख पटली होती.

तपासात असं समोर आलं होतं की, ही कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केली होती.
याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर ठाणे परिसरात राहणाऱ्या हिरेन मनसुख यांची ही स्कॉर्पिओ असल्याचं तपासात आढळून आलं होतं.

Pune News : हेमंत रासने यांची स्थायी समिती अध्यक्षपदी सलग तिसर्‍यांदा निवड; ‘महाविकास’चे नगरसेवक बंडू गायकवाड यांचा केला पराभव

Related Posts