IMPIMP

ऊस कामगारांविषयी बोलताना धनंजय मुंडे ‘भावुक’; म्हणाले – ‘माझ्या वडिलांनी ऊस तोडलाय, ‘त्या’ व्यथा मी जाणतो’

by amol
ncp leader minister dhananjay munde speaks about sugarcane workers maharashtra budget session

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन – आज धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी विधान परिषदेत “माझे वडील पंडित अण्णा मुंडे यांनी वर्षभर ऊस तोडलेला आहे. ऊसतोड कामगारांच्या व्यथा मी जाणतो म्हणूनच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून जे करतो आहे ते फार करतोय असे नाही, तर कर्तव्य समजून करतोय,” असे भावनिक विधान केले आहे.राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास बळकट केले आहे. या मंडळामार्फत ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य विमा कवच, महिलांना आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने विविध योजना, पशूंना विमा यासह विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही पुढील तीन महिन्यांच्या आत केली जाईल, ही कारवाई ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी काम करणारे सर्व नेते, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, ऊसतोड कामगार प्रतिनिधी, कारखानदार आदींशी व्यापक चर्चा करून करण्यात येईल. विधान परिषदेत आमदार सुरेश धस, आमदार विनायक मेटे यांनी अल्पकालीन चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नांना धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे
“राज्य सरकारने अर्थसंकल्पात सरसकट कारखान्यांना उसाच्या गाळपावर प्रतिटन १० रुपये अधिभार लावून, त्यातून जमा होईल तितकीच रक्कम राज्य शासन देईल व हा सर्व निधी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यामार्फत विविध कल्याणकारी योजनांना लागू करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. यापूर्वीच्या सरकारने असा विचार कधीच केला नाही किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीने अशी मागणीसुद्धा केली नाही. महाविकास आघाडी सरकारने स्वतःहून हा निर्णय घेतला, यातून आमचा हेतू शुद्ध आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे,” असे धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी सांगितले आहे.

भाजप सरकारला चिमटा
“मागील सरकारच्या काळात ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय आम्ही दुर्बीण लावून शोधले, पण ते सापडले नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून याविषयी विधायक काम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. राज्यात ऊस उत्पादन होईल तोपर्यंत महामंडळाला आता निधी कमी पडणार नाही अशी व्यवस्था आम्ही केली. त्याचे साधे अभिनंदन करायचा मोठेपणाही विरोधकांकडून दाखवण्यात आला नाही,” असा टोला धनंजय मुंडे Dhananjay Munde यांनी लगावला आहे. तसेच आमदार सुरेश धस अण्णा हे विरोधी पक्ष असल्याचा राजधर्म पाळत असावेत, असा टोमणादेखील मारला आहे.

मुला-मुलींसाठी सहा शाळा
गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे जेणेकरून त्यांची पुढची पिढी सक्षम होऊ शकेल, यादृष्टीने महामंडळाच्या वतीने ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असलेल्या विविध सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात संत भगवानबाबा यांच्या नावाने ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी सहा निवासी शाळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आली आहे.

कायद्याच्या संरक्षणासाठी सकारात्मक
“राज्य सरकारने अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्यानुसार उसावर लागणारा कर व राज्य शासनाचा वाटा यातून गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे व या संपूर्ण निधीचा उपयोग करून ऊसतोड कामगारांचे व त्यांच्या पाल्यांचे जीवनमान उंचावण्यात मदत करण्यात येणार आहे. माथाडी कामगारांना लागू असलेल्या कायद्याप्रमाणे ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांनादेखील एका समकक्ष कायदाचे संरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे आणि त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल,” असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts