IMPIMP

मनसुख अन् वाझे यांच्याशी माझा काहीएक संबंध नाही, माजी नगरसेवक धनंजय गावडेंचा खुलासा

by bali123
no relation sachin waze and mansukh hiren former corporator dhananjay gawdes revelation

सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2021) मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी (Mansukh Hiren Death Case) बोलताना पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. तसंच त्यांनी नालासोपाऱ्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे (Dhananjay Gawade) यांच्या नावाचाही उल्लेख केला. यावर आता धनंजय गावडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणी आयुष्यात कायमचं उठेल असं वक्तव्य करू नका, पुरावे असतील तर तपास यंत्रणेकडे द्या, असं गावडे म्हणाले आहेत. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन दोघांशीही माझा काडीमात्र संबंध नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे. एका वृत्तपत्रासोबत बोलताना त्यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली.

‘इतक्या बड्या नेत्यांनी असं विधान केल्यानं मला वाईट वाटत आहे’
धनंजय गावडे म्हणाले, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिनबुडाचे आणि माझी बदनामी करणारे आरोप केले आहेत. कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावेत; अन्यथा माझी बदनामी करू नका. मनसुख प्रकरणात माझं नाव आल्यानं मला आश्चर्य वाटत आहे. इतक्या बड्या नेत्यांनी असं विधान केल्यानं मला वाईट वाटत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

‘कोणत्या तरी बिल्डरला वाचवण्यासाठी माझं नाव घेणं योग्य नाही’
पुढं बोलताना गावडे म्हणाले, देशाची सर्वोत्तम तपास यंत्रणा एनआयए, महाराष्ट्र पोलीस, एटीएस तपास करत आहेत. सत्य बाहेर येईलच. हिरेन यांचा मृतदेह सापडल्यावर त्याचं लोकेशन वसई मिळाल्यानंतर कोणत्या तरी बिल्डरला वाचवण्यासाठी माझं नाव घेणं योग्य नाही. गु्न्ह्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन दिला आहे. कोणतीही ट्रायल होऊन माझे गुन्हे सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळं माझी बदनामी होईल असं वक्तव्य करू नये अशी विनंती करत आहे, असंही ते म्हणाले.

‘त्यामुळं माझी बदनामी करणं थांबवा’
गावडे म्हणतात, कोणत्या बिल्डरला वाचवत आहेत, याबाबत मी स्वत: सर्वोच्च न्यायालयाला लिहून दिलेलं आहे. माजी मुख्यमंत्री यांनी 2017 च्या एका गुन्ह्याबाबत भाष्य केलं. त्या गुन्ह्यात मी कधीही आरोपी नव्हतो. त्या गुन्ह्यात माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही तसा तपास अधिकाऱ्याचा अहवाल आणि सदर गुन्ह्याची चार्जशीटही न्यायालयात दाखल केलेली असून, त्यांना कोणती कागदपत्रे पाहिजे असतील तर त्यांनी मागितली तर मी देईन, त्यामुळं माझी बदनामी करणं थांबवा असं ते म्हणाले.

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

Related Posts