IMPIMP

ACB Trap On Police | 15 हजारांची लाच स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
Pune ACB Trap News

बीड : रकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap On Police | गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करुन त्याची वाहतूक करण्यासाठी तसेच कारवाई न करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला व एका हॉटेल चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले (Beed LCB Police). ही कारवाई मंगळवारी (दि.6) शासकीय विश्रामगृह गेवराई येथे करण्यात आली आहे. (Beed Bribe Case)

मुकेश काशिनाथ गुंजाळ (वय 52 नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, बीड), प्रमोद विठ्ठलराव कोठेकर (वय 27 व्यवसाय – हॉटेल चालक रा. साई गणेश फॅमिली रेस्टॉरंट, शासकीय निवासस्थानासमोर, गेवराई) असे लाच घेताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील 44 वर्षीय व्यक्तीने बीड एसीबी कार्यालयात तक्रार केली.(ACB Trap On Police)

तक्रारदार यांच्याकडे हायवा (MH 14 HU 2878) वाहन आहे. या हायवा मधून गेवराई तालुक्यातील गुंजेगाव पाथरवाला येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून अहमदनगर तालुक्यातील शेवगाव येथे वाळू वाहतूक करतात. वाळूची वाहतूक करू देण्यासाठी व कोणतीही पोलीस कारवाई न करण्यासाठी आरोपी पोलीस कर्मचारी मुकेश गुंजाळ याने दिनांक मंगळवारी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी बीड एसीबी कार्यालयात तक्रार दिली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता स्थानिक गुन्हे शाखेत कार्य़रत असलेल्या मुकेश गुंजाळ याने तक्रारदार यांच्याकेड 15 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम शासकीय विश्रामगृहासमोरील होटेल चालक प्रमोद कोठेकर यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना हॉटेल चालकाला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. आरोपींवर गेवराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई एसीबी छत्रपती संभाजीनगर परिक्षीत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबी चे पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम,अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे, अंबादास पुरी , स्नेहल कोरडे यांच्या पथकाने केली.

Related Posts