IMPIMP

Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | यशवंत जाधवांच्या डायरीतील ‘मातोश्री’च्या उल्लेखाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान !

by nagesh
Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | Shivsena leader mention of matoshree in yashwant jadhavs diary sanjay rauts big statement said

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी
आय टी विभागाने (IT Department) छापा मारला होता. या धाडीमध्ये जाधवांची काही व्यवहाराची कागदपत्रे सापडली असल्याचं बोललं जात होतं.
यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जाधवांची एक डायरी (Diary) सापडली होती. त्यामध्ये त्यांनी ‘मातोश्री’ला (Matoshree) 2 कोटी आणि 50 लाखांचं
घड्याळ दिल्याच्या उल्लेखाची काही वृत्त प्रसारित झाली. मात्र त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत
(Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मातोश्री म्हणजे आई असू शकत नाही का ?, आपल्या महाराष्ट्रामध्ये दानधर्म करण्याची मोठी परंपरा आहे. मी यशवंत जाधव यांनी दिलेलं स्पष्टीकरण पाहिलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, आईला दानधर्मासाठी काही पैसे दिले होते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच राऊत यांनी आय टी विभागाला मिळालेल्या डायरीवरही शंका घेतली आहे.

 

 

शिवसेनेमध्ये (Shivsena) डायरी लिहिण्याची पद्धत नाही, खोटे पुरावे आणि गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा या डायऱ्या विश्वासपात्र नसतात. डायरीमध्ये भाजप नेत्यांची नावं आली होतीत तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितलं होतं की, डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असं राऊतांनी आवर्जुन सांगितलं.

 

 

दरम्यान, यशवंत जाधव यांनीसुद्धा 2 कोटी 50 लाखांंचं घड्याळ हे आपल्या आईला दिलं असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

 

Web Title : Sanjay Raut On Yashwant Jadhav Diary | Shivsena leader mention of matoshree in yashwant jadhavs diary sanjay rauts big statement said

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे महापालिकेने ‘ई मोटारी’ घेतल्या पण चार्जिंगसाठी जावे लागते ‘भोसरी;ला

Chandrakant Patil | ‘तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडे, शिवसेना – काँग्रेस मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या’ – चंद्रकांत पाटील

Dhule Crime | व्याजाच्या बदल्यात सावकाराची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, 12 जणांवर FIR

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना केले मालामाल ! अवघ्या 35 पैशाच्या स्टॉकने दिला 5 कोटींचा रिटर्न; जाणून घ्या

 

Related Posts