IMPIMP

Anil Deshmukh | ईडीकडून अनिल देशमुखांना पुन्हा समन्स; उपस्थित न राहिल्यास ‘लूक आऊट’ची शक्यता

by nagesh
Anil Deshmukh | for the fifth time the ed summoned anil deshmukh to appear for questioning

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शंभर कोटींची खंडणी गोळा करण्याचे निर्देश दिल्याप्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यकांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर ईडीने (ED) देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले होते. चार वेळा त्यांनी ही चौकशी टाळली. मात्र ईडीने पुन्हा मंगळवारी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. तर सर्वोच्च न्यायालयानेही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने या चौकशीसाठी त्यांना उपस्थित राहावेच लागणार आहे. चौकशीसाठी ते जर उपस्थित राहिले नाही तर त्यांच्यावर ‘लूक आऊट’ नोटीसदेखील बजावली जाऊ शकते, असे संकेत ‘ईडी’ने दिले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या प्रकरणात अनिल देशमुख आणि कुटूंबियांची चार कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. ईडीने देशमुख यांना चार वेळा समन्स बजावले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने त्यांनी दरवेळी हे समन्स चुकवले. मात्र सोमवारी देशमुख यांना सर्वोच्च न्यायलायाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना मुंबईतील बॅलर्ड पीयर येथील ईडी कार्यालयात आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहे. ते उपस्थित न राहिल्यास ईडीकडून कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांना मुंबईतील बारमालकांकडून किमान ४० कोटी रुपयांची खंडणी मिळाल्याची ठोस माहिती ‘ईडी’कडे असल्याचे सांगितले जाते.
त्याचबरोबर देशमुख यांनी खासगी बँकांमधून कर्जे घेतले आहेत.
नियमांचे उल्लंघन करत हि सर्व कर्जे वितरित केल्याचे दिसून येत आहे.
या नियमबाह्य कर्जाऊ रक्कमेचा वापर देशमुख यांनी बनावट कंपन्यांसाठी केला.
त्यांनी ही रक्कम कुटुंबीयांच्या नावे वेगवेगळ्या कंपन्यांत गुंतवली, असे दिसून येत आहे.
या सर्वांच्या चौकशीसाठी ईडीने हे समन्स बजावले आहे.

 

Web Title :- Anil Deshmukh | for the fifth time the ed summoned anil deshmukh to appear for questioning

 

हे देखील वाचा :

Supreme Court | पत्नीला घटस्फोट देऊ शकता, मुलांना नाही; 4 कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

Modi Government | मोदी सरकारच्या ‘या’ स्कीममध्ये 30 रुपयांपेक्षा सुद्धा कमीमध्ये मिळेल 4 लाखाचा मोठा फायदा, तुम्ही सुद्धा घेऊ शकता लाभ

Sunanda Pushkar Death Case | सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता

 

Related Posts