IMPIMP

RTI कार्यकर्ता रवींद्र बराटे टोळीवर दुसऱ्यांदा ‘मोक्का’, पुणे पोलिसांकडून कारवाई

by amol
ravindra barathe

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे Ravindra Barate, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह 14 जणांवर यापूर्वी मोक्का कारवाई केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी बराटे टोळीवर दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांनी टोळीप्रमुख रवींद्र लक्ष्मण बराटे Ravindra Barate (रा. बिबवेवाडी), बडतर्फ पोलीस शैलेश हरिभाऊ जगताप, परवेझ शब्बीर जमादार, पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन, प्रशांत पुरुषोत्तम जोशी (वय 36), प्रकाश रघुनाथ फाले (वय 41), विशाल गजानन तोत्रे (वय 36) आणि पत्रकार संजय भोकरे (वय 58) यांच्यावर मोक्कानुसार कारवाई केली आहे.

एका 68 वर्षीय महिलेच्या पर्वती येथील जागेचा ऋषिकेश बारटक्के याच्याशी परस्पर व्यवहार करून 70 लाख घेऊन फसवणूक व विश्वासघात करून जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. तसेच या जमिनीच्या व्यवहारात तडजोडीसाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली. याशिवाय बारटक्के Ravindra Barate याच्यासोबत व्यवहार केल्याने परिषद घेऊन बदनामी करत घरी हस्तक पाठवून धमक्या देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे करत आहेत. तपासात आरोपींनी टोळी केल्याचे समोर आले. या टोळीचा प्रमुख हा बराटे असून, तो इतरांना सांगून कामे करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार या टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांनी वरिष्ठांकडे पाठवला होता. त्यानुसार या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी बराटे टोळीवर मोक्का कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून गंभीर गुन्हे कारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 11 टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बराटे टोळीवर केलेली मोक्काची ही दुसरी कारवाई असून, या वर्षात 7 मोक्काच्या कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Posts