IMPIMP

आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह दोघांना अटक

by sikandershaikh
pune police

पुणे :सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)pune police | टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह दोघांना खडक पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आदेकर (वय 60) आणि ऋषभ आंदेकर (वय 21) या दोघांना अटक केली आहे तर इतर 8 ते 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार कुडले (वय 21) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तर, 16 वर्षीय मुलाच्या तक्रारीवरून कानिफनाथ महापूरे याच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (pune police ) दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होत असून ते फिर्यादी कुडले आणि त्याचा मित्र सूरज ठोंबरे या दोघांमुळे होत आहे,
या रागातून हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आपल्या टोळीचे वर्चस्व कमी होण्यास हे लोक जबाबदार असल्याच्या रागातून बंडू आंदेकर याच्या
सांगण्यावरून इतर आरोपींनी गेल्या आठवड्यात फिर्यादी तरुणावर पालघन व कोयत्याने हल्ला केला.
त्यात फिर्यादी तरुण जखमी झाला आहे.
तर 16 वर्षाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीत फिर्यादी हा थांबला असताना आरोपी ट्रिपलशीट आले तसेच त्यांनी
शिवीगाळ करत सूरज ठोंबरेच्या बातम्या हाच आंदेकर टोळीला देतो आणि लावा लाव्या करतो,
असे म्हणत सूरज भाऊंनी यालाच संपावयला सांगितले आहे असे म्हणून हवेत कोयते फिरवत त्याच्यावर हल्ला केला.
तर परिसरात गोंधळ घालून दहशत निर्माण केली असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, मध्यरात्री उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर व
खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बहिरट यांच्या पथकाने बंडू आंदेकर आणि एकाला घरातून पकडले.

Video : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, शिवप्रेमींमध्ये नाराजी; विधानसभेत आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी उचलला मुद्दा

Related Posts