IMPIMP

UP : भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

by pranjalishirish
uttar pradesh bjp leader brijesh singh shot dead in gorakhpur

गोरखपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील भाजप नेते व माजी सरपंच बृजेश सिंह  Brijesh Singh यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ते ग्रामचंपायत निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. त्यांच्या हत्येनंतर आता एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. गोरखपूरमध्ये गेल्या 8 दिवसात हत्येच्या 7 घटना घडल्या आहेत. यामुळं आता तिथं दहशतीचं वातावरण आहे. या घटनांमुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थि होताना दिसत आहे.

‘महाराष्ट्राच्या वाट्याला किती शून्य आले हे फडणवीसांनी सांगावे’; आव्हाडांचा टोला

बृजेश सिंह सरपंचपदाचे प्रमुख दावेदार होते

गुलरिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपूर गावातील बृजेश सिंह Brijesh Singh  यांची शुक्रवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. बृजेश सिंह निवडणूक प्रचार उरकून आपल्या गावातून गोरखपूरला जात होते. ते आपल्या गावचे माजी सरपंच आणि भाजपचे सेक्टर प्रभारी होते. यावेळी ते सरपंचपदाचे प्रमुख दावेदार होते.

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…

नेमकं काय घडलं ?

बृजेश सिंह गावात प्रचार उरकून रात्री 11 वाजता गोरखपूर शहरातील आपल्या निवासस्थानी जात होते. यावेळी दुचाकीस्वार गावाबाहेरच दबा धरून बसले होते. त्यांनी सिंह यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. सिंह यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. कुटुंबीय देखील आले होते. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं गेलं. तिथं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.

प्रॉपर्टी डिलरसोबत 2 दिवसांपूर्वीच जमिनीवरून झाला होता वाद

दोन दिवसांपूर्वीच सिंह Brijesh Singh  यांचा जमिनीवरून प्रॉपर्टी डिलरसोबत वाद झाला होता. त्यामुळं त्या दिशेनंही तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुनील श्रीवास्तव आणि रामसमुझ या दोघांना अटक केली आहे. इतर दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.

उद्योजक महिंद्रांबाबतच्या विधानावरून मनसेनं मुख्यमंत्र्यांना सुनाावलं, म्हणाले – ‘…म्हणून तुम्हाला आरोग्यसेवक मिळत नाहीत

गेल्या 8 दिवसात 7 हत्या

गोरखपूरमध्ये गेल्या 8 दिवसात हत्येच्या 7 घटना समोर आल्या आहेत. त्यामुळं आता तिथं भीतीचं वातावरण पसरलं आहे. गोरखपूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही हत्यांच्या घटना घडतच आहेत. यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Also Read : 

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’

Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

Related Posts