IMPIMP

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

by pranjalishirish
actor kamal khan krk says today rss people are deshbhakt and all others are deshdrohi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी हे काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत आहेत. त्यानंतर आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्यानेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर RSS निशाणा साधला आहे. या अभिनेत्याने देशात केवळ संघवाले तेवढे देशभक्त आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही बनले आहेत असा आरोप केला आहे. अभिनेता कमाल खान यांनी ट्विटरद्वारे हि टीका केली आहे. कमाल खान यांच्या ट्विटनंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. RSS ला यापुढे आता संघ परिवार म्हणणार नाही, असे विधान काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केले होते. या नंतर आता मनोरंजन क्षेत्रातील अभिनेत्याने संघावर टीका केली आहे.

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

काय म्हणाले कमाल खान?
अनेकदा समजून घेण्याचा प्रयत्न करतो की, काय खरं आहे? काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे? परंतु, याचे उत्तर मिळत नाही. प्रत्येक भारतीयाला तो ब्रिटिशांच्या अमलाखाली होता, हे माहिती आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यास नकार दिला होता. सरदार पटेल यांनीही RSS वर बंदी घातली होती. पण, आज केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले तेवढे देशभक्त म्हणवून घेत आहेत आणि बाकी सगळे देशद्रोही ठरत आहेत, अशी टीका कमाल खान यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

यापुढे ‘संघ परिवार’ म्हणणार नाही
काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना यापुढे आपण ‘संघ परिवार’ असे म्हणणार नाही असे ट्विट केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्याशी संबंधित संघटनांना परिवार म्हणणे चुकीचे आहे कारण परिवारात महिला व ज्येष्ठांप्रती आदर आणि प्रेम दाखवले जाते; परंतु संघ परिवारात तसे काहीच आढळत नाही म्हणून संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना परिवार संबोधणे चुकीचे ठरेल, अशा प्रकारची टीका राहुल यांनी केली होती. तसेच आपण यापुढे ‘संघ परिवार’ असा उच्चार करणार नाही, असेदेखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे.

Also Read:

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

पवार-शहा भेटीबद्दल प्रफुल्ल पटेल यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, राज्य सरकार स्थिर’

इंदुरीकर महाराजांना मोठा दिलासा ! न्यायालयानं रद्द केला ‘तो’ खटला

1 एप्रिलपासून कामाचे तास, वेतन बदलणार; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

Related Posts

Leave a Comment